आता भारतीय हवाई दलात दाखल होणार अपाचे, 8 लढाऊ विमानांचा होणार समावेश

- Advertisement -

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य आता अजून वाढणार आहे. जगातील सर्वात उत्कृष्ट लढाऊ विमानांमधील अपाचे हेलिकॉप्टरचा भारतीय हवाई दलामध्ये समावेश होणार आहे. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धनोआ आज पंजाबच्या पठानकोट एअरबेसवर 8 अपाचे हेलिकॉप्टरचा समावेश करणार आहेत. ज्या ठिकाणी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी 2016 मध्ये हल्ला केला होता. त्याच पठानकोट एअरबेसमध्ये या 8 लढाऊ हेलिकॉप्टरचा समावेश होणार आहे.

60 फूट उंच आणि 50 फूट रुंद अपाचे हेलिकॉप्टरला उडवण्यासाठी 2 पायलट असणे गरचेचे आहे. अपाचे हेलिकॉप्टरचे मोठे विंग चालवण्यासाठी 2 इंजिन होते. यामुळे याचा वेग खूप जास्त आहे. 2 सीटर असे हे हेलिकॉप्टर आहे. यामध्ये हेलिफायर आणि स्ट्रिंगर मिसाइल लागलेल्या आहेत. यामध्ये एक सेन्सरही आहे. यामुळे हे हेलिकॉप्टर रात्रीही ऑपरेशन करु शकते. या हेलिकॉप्टरची स्पीड जास्तीत जास्त 280 किलोमीटर प्रति तास आहे. अपाचे हेलिकॉप्टरची डिझाइन वेगळी आहे. यामुळे हे रडारवर पकडणे अवघड असते.

अपाचे हेलिकॉप्टर हे अमेरिका निर्मित आहे. AH-64E हे हेलिकॉप्टर जगातील सर्वात अडवान्स मल्टी रोल कॉम्बेट हेलिकॉप्टर आहे. भारत आणि अमेरिकामध्ये सप्टेंबर 2015 मध्ये एक डील झाली होती. यानुसार भारताला 22 हेलिकॉप्टर मिळणार आहेत. यापूर्वी 27 जुलैला 4 हेलिकॉप्टर मिळाले आहेत. आता आठ हेलिकॉ मंगळवारी मिळणार आहेत.

- Advertisement -