आता मिसेस सोढीनंही सोडली ‘तारक मेहता…’मालिका?जेनिफर मिस्त्रीनं केला खुालासा

आता मिसेस सोढीनंही सोडली ‘तारक मेहता…’मालिका?जेनिफर मिस्त्रीनं केला खुालासा
- Advertisement -


हायलाइट्स:

  • अभिनेत्री जेनिफर मिस्त्री ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ सोडल्याच्या होत आहेत चर्चा
  • शो सोडल्याच्या चर्चांवर जेनिफर मिस्त्रीनं दिली प्रतिक्रिया
  • जेनिफर मिस्त्रीनं सांगितलं शो सोडल्याच्या चर्चांमागचं सत्य

मुंबई:तारक मेहता का उल्टा चश्मा‘ या शोमधील ‘मिसेस सोढ़ी‘ ही भूमिका साकाणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनं हा शो सोडल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहेत. लॉकडाऊननंतर दमन येथील शूटिंग संपवून संपूर्ण टीम मुंबईला परतली. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यात अभिनेत्री जेनिफर मिस्त्री मात्र दिसली नव्हती. त्यामुळे या चर्चांना उधाण आलं होतं. पण आता जेनिफरनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

मागच्या दोन महिन्यांपासून जेनिफर मिस्त्री ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या कोणत्याही एपिसोडमध्ये दिसलेली नाही. त्यामुळे जेनिफरनं हा शो सोडल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. ज्यावर जेनिफरनं नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत इ- टाइम्सशी बोलताना जेनिफर म्हणाली, ‘मला लोक मेसेज करून विचारत आहे की मी ‘हा शो सोडला आहे का?’ काही लोक तर मला ‘प्रेग्नन्ट आहेस का?’असंही विचारत आहेत. पण हे सत्य नाहीये. मागच्या काही काळापासून माझी तब्येत ठीक नाहीये ज्यामुळे मी शोचं शूटिंग करत नाही आहे.’

जेनिफर पुढे म्हणाली, ‘एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढल्यानं लोकेशन बदलण्यात आलं. या शोचं शूटिंग दमनला सुरू करण्यात आलं होतं पण मी तिथे गेले नाही. माझ्या पायांमध्ये फार वेदना होत्या ज्यामुळे मी व्यवस्थित चालूही शकत नव्हते. मी मेकर्सना या शेड्यूलमधून माझं नाव काढून टाकण्यास सांगितलं होतं. माझी औषध सुरू आहेत पण अजून आराम मिळालेला नाही. मे महिन्यात काही दिवस ताप आल्यानंतर ही समस्या आणखी वाढत गेली होती.’

जेनिफरनं यावेळी आपण हा शो सोडला नसल्याचं सांगत पुन्हा शूटिंगला सुरुवात करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. ती म्हणाली, ‘मी फक्त त्यांच्या कॉलची वाट पाहत आहे. जसं ते कॉल करतील तसं मी लगेचच शोचं शूटिंग सुरू करणार आहे. शोची टीम सातत्यानं माझ्या संपर्कात आहे.’



Source link

- Advertisement -