हायलाइट्स:
- बिग बॉस १५ मध्ये अंकिता लोखंडे, रिया चक्रवर्तीशी साधला निर्मात्यांनी संपर्क?
- सोशल मीडियावर सुरू झाली जोरदार चर्चा
- यासंदर्भात निर्मात्यांनी दिली नाही कोणतीही प्रतिक्रिया
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉसचे निर्मात्यांनी या कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी रिया चक्रवर्तीला निर्मात्यांनी संपर्क साधला आहे. रियाने जर कार्यक्रमात सहभागी होण्यास होकार दिला तर निर्माते अंकिता लोखंडे हिला देखील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क साधू शकतात.
अर्थात या दोघींशी संपर्क साधला असल्याच्या वृत्ताबाबत निर्मात्यांनी काहीही उत्तर दिलेले नाही. अंकिता आणि रिया या दोघीजणी सुशांत सिंह राजपूतच्या प्रेयसी होत्या. जर या दोघीजणी बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून येण्यासाठी तयार झाल्या तर बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा सुशांतसिंहचा विषय चर्चिला जाईल.या दोघींना बिग बॉसच्या निर्मात्यांनी संपर्क साधला असल्याच्या बातम्या आल्यांतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांनी यावरून त्यांची मते मांडायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी वरुण सूद, नेहा मर्दा, भूमिका चावला, पार्थ समथान, रिया चक्रवर्ती, सुरभी चंदना, दिशा वकानी, कृष्णा अभिषेक सहभागी होऊ शकतात अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अर्थात या नावांबद्दल निर्मात्यांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही. या कार्यक्रमाचा प्रिमिअर ऑक्टोबर २०२१ मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.