Home शहरे उस्मानाबाद आत्महत्येस कारणीभूत चौघा विरुद्ध अट्रोसिटी

आत्महत्येस कारणीभूत चौघा विरुद्ध अट्रोसिटी

0

उस्मानाबाद । १५ जुलै : तालुक्यातील येडशी येथील एका युवकाचा 7 जुलै रोजी मृत्यू झाला. त्याची चौकशी सुरू असताना मृत युवकाच्या भावाने दिलेल्या निवेदनावरून चौघा जणांविरुद्ध अट्रोसिटीसह अन्य गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. चौघेही बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील बदलापूरचे आहेत.

येडशी येथील उमेश उत्तम होवाळ (38 वर्षे) यांचा 7 जुलै रोजी मृत्यु झाला होता. त्या संबंधी अकस्मात मृत्यु क्र. 35/2020 नोंदवून चौकशी सुरु होती. मौजे बदलापूर, ता. अंबाजोगाई येथील शेख कुटूंबातील- नसरीना हिच्यासह तीची आई, भाऊ, चुलता यांनी सन- 2018 च्या रामलींग यात्रेपासून वेळोवेळी उमेश होवाळ यांना पैशांसाठी ब्लॅकमेल करुन त्यांचा छळ केला. या छळास कंटाळून उमेश यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराचे निवेदन मयताचा भाऊ- जितेंद्र उत्तम होवाळ यांनी चौकशी दरम्यान पोलीसांत दिल्याने नमूद चौघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 384, 385, 506, 34 सह ॲट्रॉसीटी कायदा अंतर्गत गुन्हा दि. 15.07.2020 रोजी नोंदवला आहे.