Home मनोरंजन आथिया शेट्टीने शेअर केला के एल राहुल सोबतचा स्टायलिश फोटो, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

आथिया शेट्टीने शेअर केला के एल राहुल सोबतचा स्टायलिश फोटो, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

0
आथिया शेट्टीने शेअर केला के एल राहुल सोबतचा स्टायलिश फोटो, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

[ad_1]

हायलाइट्स:

  • आथियाने शेअर केला के एल राहुल सोबतच स्टायलिश फोटो
  • फोटो पाहून चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण
  • काही तासांतच फोटोला मिळालेत लाखो लाइक

मुंबई– बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आथिया शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आथिया तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. आथिया भारतीय क्रिकेटर याला डेट करत असल्याच्या चर्चा नेहमी सोशल मीडियावर पाहायला मिळतात. राहुल आणि आथियाचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर वायरल होत असतात. राहुल आणि आथिया देखील एकमेकांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. परंतु, आता आथियाने शेअर केलेल्या फोटोंमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. आथियाने राहुलसोबत एक स्टायलिश फोटो शेअर केला आहे.

संपत्तीच्या बाबतीत शाहरुख- अक्षयला लाजवतील मिथून चक्रवर्ती

आथियाने तिच्या इन्स्टाग्रामवरून राहुलसोबतचा एक स्टायलिश फोटो शेअर केला आहे. ज्यात ते दोघे एकत्र पोज देताना दिसत आहेत. राहुलने काळ्या रंगाचा कोट पांढऱ्या रंगाचा हायनेक टी- शर्ट परिधान केला आहे तर आथियाने जांभळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस घातला आहे. दोघेही डोळ्याला गॉगल लावून फोटोसाठी पोज देत आहेत. दुसऱ्या फोटोत आथिया फोटोसाठी पोज देत आहे. आथियाने शेअर केलेले हे फोटो काही तासातच सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. थोड्याच वेळात या फोटोंना लाखो लाइक मिळाले आहेत. सोबतच या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.


आथियासोबतच राहुलने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. त्यांचे फोटो पाहून चाहत्यांनी पुन्हा एकदा ते एकत्र असल्याचा अंदाज लावला आहे. हे फोटोशूट एका ब्रॅण्डसाठी करण्यात आलं असलं तरीही चाहत्यांनी त्याचा आपल्या परीने अर्थ लावला आहे. काही दिवसांपूर्वी आथियाने शेअर केलेल्या फोटोंमुळे युझर्सनी आथिया इंग्लंडला असल्याचा तर्क लावला होता. राहुलदेखील भारतीय क्रिकेट संघासोबत इंग्लंडमध्ये आहे. आथियाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती ‘मोतीचूर चकनाचूर’ चित्रपटात झळकली होती. त्यापूर्वी ‘मुबारका’, ‘नवाबजादे’ आणि ‘हिरो’ चित्रपटातही आथियाने काम केलं आहे.

नीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी घातलेली लग्नाची मागणी



[ad_2]

Source link