Home ताज्या बातम्या आदित्य,तु महाराष्ट्रासाठी घेत असलेले कष्ट पाहून आम्हाला तुझा अभिमान वाटतो – अजिंक्य रहाणे

आदित्य,तु महाराष्ट्रासाठी घेत असलेले कष्ट पाहून आम्हाला तुझा अभिमान वाटतो – अजिंक्य रहाणे

मुंबई :-शफीक शेख

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आज वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. १३ जून १९९० रोजी जन्म झालेले आदित्य ठाकरे आज आपला ३०वा वाढदिवस साजरा करत आहेत.

अजिंक्यने ट्विटरवर आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे की, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदित्य. तु महाराष्ट्रासाठी घेत असलेले कष्ट पाहून आम्हाला तुझा अभिमान वाटतो. तुला हे वर्ष सुखसमृद्धीचे जावो.

दरम्यान आदित्य यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी देशात आणि राज्यात असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. तसंच शिवसैनिकांनी असतील त्या ठिकाणाहूनच शुभेच्छा देण्याची विनंती त्यांनी केली आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे एक सत्कार्य होईल आणि याचा मला निश्चितच आनंद होईल.