मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक दिपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरुवार, दि. 4 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
मुंबईसारख्या महानगरात आपत्ती व्यवस्थापन हे आव्हानात्मक काम आहे. महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हे कार्य कसे करतो, पावसाळ्यातील नियोजन, मुंबई वातावरण कृती आराखडा, आपत्ती मदत कक्षाचे कामकाज, समुद्र किनारपट्टीलगत पर्यटकांनी घ्यावयाची काळजी, मदत आणि सूचनांसाठी समाजमाध्यमांचा वापर, जुन्या इमारतीतील नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, पावसाळ्यातील वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना, आपत्ती व्यवस्थापनात लोकसहभागाचे महत्त्व आदी विषयांबाबत सविस्तर माहिती संचालक श्री.नार्वेकर यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.
000000