Home मनोरंजन आपलं कोकण फक्त वीकेंड एन्जॉय करण्याठी नाहीए…भरत जाधव यांचं नागरिकांना भावनीक आवाहान

आपलं कोकण फक्त वीकेंड एन्जॉय करण्याठी नाहीए…भरत जाधव यांचं नागरिकांना भावनीक आवाहान

0
आपलं कोकण फक्त वीकेंड  एन्जॉय करण्याठी नाहीए…भरत जाधव यांचं नागरिकांना भावनीक आवाहान

[ad_1]

हायलाइट्स:

  • कोकणातील पूरग्रस्तांसाठी भरत जाधवने केले आवाहन
  • भरत जाधवने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
  • कपडे, किराणा सामान अशा विविध वस्तू देण्याची केली विनंती

मुंबई : राज्यात सातत्याने पाऊस पडत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. संतंतधार कोसळणा-या पावसामुळे कोकणातील अनेक नद्यांना पूर आला असून काही गावे पाण्याखाली गेली आहेत. सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळून जीवित व वित्तहानी झाली आहे. चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरड कोसळलेल्या आणि पुराचा तडाखा बसलेल्या भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोकणातील लोकांना मदत करण्यासाठी चहूबाजूंनी मदतीचे हात पुढे येत आहेत. अभिनेता भरत जाधवने शक्य होईल त्या मार्गाने कोकणात मदत पाठवण्याचे आवाहन चाहत्यांनी केले आहे.

अभिनेता भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कोकणातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदत करण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना भरतने लिहिले आहे, ‘आपले कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरते नाही. या पूरसंकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या,’ असे लिहिले आहे. या पोस्टमध्ये जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ, किराणा सामान, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर्वस्त्रे, अंथरुण-पांघरूण म्हणून वापरता येणारी जाड कपडे अशा विविध प्रकारे मदत करण्यासाठीची माहिती यावर दिलेली आहे. सोबतच संपर्क क्रमांकसुद्धा दिले आहेत.


पावसामुळे राज्यातील रायगड जिल्ह्यातील तळीये गावामध्ये दरड कोसळून सुमारे ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबचे कुटुंबे मातीच्या ढिगा-याखाली गाडली गेली आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. रायगडमधील महाडमध्ये आणि कोकणच्या चिपळूणमध्ये पूराची स्थिती उद्भवल्याने अनेक कुटुंब घरात अडकून पडली आहेत. पुरात आणि भूस्खलनामुळे ढिगा-याखाली अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, इतर काही ठिकाणी भूस्खलनाची शक्यता असल्यास तेथील रहिवाशांना वेळीच स्थलांतरित करावे अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.



[ad_2]

Source link