मुंबई दि. 26 : आपल्या मधुर व रसाळ वाणीतून समाज प्रबोधन करत कीर्तन परंपरेची ख्याती जगभरात पोहोचवलेले ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने राज्यातील एक चक्रवर्ती संत हरपले आहेत, अशा शब्दात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे.
बाबा महाराजांनी कायमच आपल्या सुमधुर वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने राज्यातील एक महान विभूती, एक चक्रवर्ती संत हरवले असल्याची भावना मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केली असून, त्यांच्या स्मृतीस श्री. मुंडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
००००
दत्तात्रय कोकरे/विसंअ/
- Advertisement -