Home ताज्या बातम्या आमचे कुटुंब…आई-बाबा, वाघ, बिबळ्या, नीलगाय…

आमचे कुटुंब…आई-बाबा, वाघ, बिबळ्या, नीलगाय…

0
आमचे कुटुंब…आई-बाबा, वाघ, बिबळ्या, नीलगाय…

म. टा. विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईकरांना वन्यप्राण्यांचा शेजार लाभला आहे. हे बिबळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीमध्ये मानवी वस्तीपर्यंत येऊन आपली शिकार शोधत येतात. गेल्या काही महिन्यांमध्ये बिंबसार नगर, नागरी निवारा येथील अनेक नागरिकांनी बिबळ्याची भ्रमंती प्रत्यक्ष व फोटोंमधून पाहिली. या वन्यप्राण्यांशी अधिक जवळीक साधण्याची संधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्राणी दत्तक योजनेमध्ये मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पार्श्वभूमीवर लाभलेला वन्यप्राण्याचा सहवास अधिक समृद्ध पद्धतीने अनुभवता यावा यासाठी उद्यानातील प्राण्यांना दत्तक देण्याची योजना सन २०१३पासून अंमलात आली. यंदा आत्तापर्यंत १२ वन्यप्राण्यांना दत्तक घेण्यात आले असून, यामध्ये अधिकाधिक सामान्य नगारिकांनाही जोडले जावे असा प्रयास आहे. या प्राण्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी दत्तक घेता येऊ शकते. वाघासाठी ३ लाख १० हजार, सिंहासाठी ३ लाख, बिबळ्यासाठी १ लाख २० हजार, वाघाटीसाठी ५० हजार, नीलगायीसाठी ३० हजार, चितळासाठी २० हजार तर भेकरासाठी १० हजार रु. अशी दत्तक रक्कम निर्धारित करण्यात आली आहे.

यंदा आठ बिबळे, दोन नीलगायी आणि दोन चितळ यांना दत्तक घेण्यात आले आहे. यामध्ये खासदार , आमदार प्रताप सरनाईक, क्रिकटेपटू संदीप पाटील, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांची मुलगी यांनी या प्राण्यांना दत्तक घेतले आहे. या चारही जणांनी बिबळ्याला दत्तक घेतले आहे. करोनाच्या काळामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आर्थिक स्रोतांवरही परिणाम झाला आहे. या माध्यमातून या प्राण्यांच्या देखभालीसाठी हातभारही लागू शकतो. मात्र त्याहीपेक्षा अधिक मुंबईकरांचे वन्यजीवांशी असलेले नाते अधिक दृढ होऊ शकते, असे मत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनसंरक्षक आणि संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी व्यक्त केले.

येथे साधा संपर्क

वन्यप्राण्यांचा शेजार आणि त्यांचा परिसरातील वावर हा उपद्रव न वाटता आपल्या अन्नसाखळीचे, आपल्या परिसंस्थेचे हे प्राणी एक अविभाज्य घटक आहेत, ही जाणीव अधिक रुजू लागते. यासाठी ही दत्तक योजना उपयोगी पडत आहे. उद्यानामध्ये सध्या मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांनाही आवर्जून या दत्तक योजनेची माहिती दिली जात आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी [email protected] या ईमेलवर किंवा ७०२०२८२७१४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

वार्षिक दत्तक रक्कम
वाघ : ३ लाख १० हजार रु.

सिंह : ३ लाख रु.

बिबळ्या : १ लाख २० हजार रु.

वाघाटी : ५० हजार रु.

नीलगाय : ३० हजार रु.

चितळ : २० हजार रु.

भेकर : १० हजार रु.

Source link