Home शहरे जळगाव आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या उपोषणा मुळे,एरंडोल-पारोळा तालुक्यासाठी 49 कोटीचा दुष्काळीनिधी मंजूर झाल्याचे आश्वासन

आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या उपोषणा मुळे,एरंडोल-पारोळा तालुक्यासाठी 49 कोटीचा दुष्काळीनिधी मंजूर झाल्याचे आश्वासन

0

एरंडोल (जळगाव) :

एरंडोल पारोळा तालुक्यासाठी 49 कोटी रुपयाचा दुष्काळ निधीचा प्रस्ताव बोंड आळीचा 11 कोटी 70 लाखांचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन सचिव यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे आश्वासन मिळाल्यामुळे आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी संध्याकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास उपोषण मागे घेतले. वीज मीटर बदलविण्यात बाबतही लेखी आश्वासन देण्यात आले.
5 ऑगस्ट रोजी आमदार सतीश पाटील हे जनहिताच्या विविध मागण्यांसाठी एरंडोल तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वा. उपोषणास बसले त्यांच्या उपोषणास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन व यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला उपोषण प्रसंगी अॅड. रवींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादीचे पारोळा तालुकाध्यक्ष यशवंत पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस दिगंबर पाटील, दिलीप पाटील, मेहमूद खा पठाण, युवराज पाटील, भास्कर पाटील, योगेश रोकडे, रोहन मोरे, जी.प .सदस्य रोहन पाटील, व हिंमत पाटील पारोळा पंचायत समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटील पंचायत समिती सदस्य अशोक पाटील, कल्पिता पाटील, सुदाम पाटील, ललित बागुल, विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, संदीप वाघ, आर ए शिंदे, ईश्वर बिराडेअॅड. अहमद सैय्यद, रोहिदास पाटील, रामधन पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ राजेंद्र देसले, प्रवीण पाटील, कृषीभूषण झिपरू पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच प्रांतअधिकारी विनय गोसावी यांनी सचिव किशोर राजे निंबाळकर जिल्हाधि डॉ.अविनाश ढाकणे, यांच्याशी आमदार डॉक्टर सतीश पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बोलणे करून दिले. यावेळी तहसीलदार अर्चना खेतमाळीस करून हजारे, कृषी अधिकारी आर एच पाटील, मुख्याधिकारी किरण देशमुख, आधी उपस्थित होते…….