आमदार दिलीप लांडेंनी अंगावर कचरा टाकलेल्या कंत्राटदाराला श्वसनाचा त्रास; रुग्णालयात दाखल

आमदार दिलीप लांडेंनी अंगावर कचरा टाकलेल्या कंत्राटदाराला श्वसनाचा त्रास; रुग्णालयात दाखल
- Advertisement -

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी अंगावर कचरा ओतून अमानुष वागणूक दिलेल्या कंत्राटदाराला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे संसर्ग झाल्याचा दावा कंत्राटदाराने केला असून लांडे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कुर्ला कमानी परिसरातील संजयनगर येथे नालेसफाईचे काम व्यवस्थित न झाल्याने पाणी तुंबण्याचा प्रकार घडल्याचा दावा दिलीप लांडे यांनी केला आहे. या कंत्राटदाराला रविवारी १३ जूनला घाणेरड्या पाण्यात बसवून अंगावर कचरा ओतण्यात आला होता. या घटनेचा धसका घेऊन तो आजारी पडला असून त्याला बोरीवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवसेना आमदाराने कंत्राटदाराला चिखलात बसवले; कचऱ्याने घातली आंघोळ!

Source link

- Advertisement -