Home शहरे उस्मानाबाद आमदार, नगरध्यक्ष व सेवाभावी व्यक्ती, संस्थांच्या वतीने दहा टन ज्वारीचे करणार वितरण

आमदार, नगरध्यक्ष व सेवाभावी व्यक्ती, संस्थांच्या वतीने दहा टन ज्वारीचे करणार वितरण

0

उस्मानाबाद । प्रतिनिधी । ११ एप्रिल :उस्मानाबाद जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व गोर गरीब कुटुंबियांची दररोजच्या अन्नाची सुविधा व्हावी यासाठी आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हा प्रशासन व सेवाभावी संस्था यांच्याकडून दहा टन ज्वारी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये ज्वारी करिता आमदार कैलास पाटील व मकरंद राजे निंबाळकर यांनी प्रत्येकी रोख रक्कम पन्नास हजार, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व पालकमंत्र्यांचे खाजगी सचिव बप्पासाहेब थोरात यांनी प्रत्येकी वीस हजार रुपये दिले आहेत.

जिल्हयाचे पालक सचिव अनिल डिग्गीकर यांनी सोडियम हायफोक्लोराइट फवारणीसाठी चाळीस लिटर क्षमतेचे एकशे वीस ड्रम दिले आहेत. ते जिल्हयातील शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीना पुरविण्यात येणार आहेत.

हे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल भवनात उतरुन घेण्यात आले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, तहसिलदार गणेश माळी, सहाय्यक नियोजन अधिकारी सोमनाथ रेडडी, नगर परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी बाबासाहेब मनोहरे, नायब तहसिलदार केरूलकर, पालमंत्रयाचे स्वीय सहाय्य्क श्रध्दानंद पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते.