हायलाइट्स:
- आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच काही ना काही कारणानं असते चर्चेत
- आयरा खान तिच्या पर्सनल लाइफमुळे अनेकदा सोशल मीडियावर होते ट्रोल
- आयरा खान इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे आली आहे अडचणीत
आयरा खान सध्या बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत हिमाचल प्रदेशमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. या ठिकाणचा एक फोटो शेअर करताना आयरानं तिच्या चाहत्यांना गुड मॉर्निंग विश केलं होतं. पण या फोटोमुळे तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल व्हावं लागलं आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये आयरा खान तिच्या डॉगीसोबत एका बेंचवर बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये आयरानं ब्लॅक टी-शर्ट, ब्लू शॉर्ट्स आणि डेनिम जॅकेट घातलेलं दिसत आहे. सनग्लासेस आणि मोकळे केस यात आयरा खूपच सुंदर दिसत आहे. पण या फोटोतील तिच्या लुकपेक्षा तिच्या बाजूला असलेल्या बॉक्सनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जे सिगारेटचं पाकीट असल्याचं बोललं जात आहे आणि यावरूनच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
आयराच्या फोटोवर कमेंट करताना अनेक युझरनं तिच्या बाजूला असलेला बॉक्सचा उल्लेख करत ती सिगारेट ओढते का असं प्रश्न विचारला आहे. एक युझरनं कमेंट करताना लिहिलं, ‘तू कोणत्या ब्रँडची सिगारेट ओढतेस’ तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, ‘सिगारेट आणि लायटरही फोकसमध्ये आलं आहे.’ अशा कमेंट करत अनेक युझर्सनी तिला ट्रोल केलं आहे. तसेच अनेकांनी तिला धूम्रपान न करण्याचा सल्ला दिला आहे.