हायलाइट्स:
- आमिर खाननं काही दिवसांपूर्वीच पत्नी किरण रावला दिला घटस्फोट
- वेगवेगळ्या कारणांनी सातत्यानं चर्चेत आहे अभिनेता आमिर खान
- आमिर खान आणि क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या भेटीचा किस्सा सोशल मीडियावर चर्चेत
अभिनेता आमिर खान २००९ साली त्याचा चित्रपट ‘थ्री इडियट्स‘चं प्रमोशन करत होता. त्यावेळी त्यानं माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या घरी जाऊन त्याची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी त्यानं आमिर खान नाही तर सौरवचा चाहता असल्याचं भासवलं. तो अशा वेशात उभा होता की, तो आमिर खान असल्याचं कोणाला ओळखताही आलं नाही. त्यानं एखाद्या चाहत्याप्रमाणे सौरवच्या घरी जाऊन त्याच्यासोबत फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला. पण अनेक प्रयत्न करूनही सौरवच्या गार्ड्सनी त्या एंट्री देण्यास नकार दिला आणि माघारी पाठवलं.
आमिर खानच्या या भेटीबद्दल जेव्हा सौरवला समजलं तेव्हा त्यानं आमिरची भेट घेतली आणि आमिर खानला त्याची पत्नी किरण रावसोबत आपल्या घरी डिनरसाठी बोलवलं. त्यानंतर चाहत्याच्या रुपात आमिरचं सौरवच्या घरी जाणं आणि नंतर सौरवसोबतचं डिनर याचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच आमिर खाननं आपली दुसरी पत्नी किरण रावला लग्नाच्या १५ वर्षांनंतर घटस्फोट दिला. त्यानंतर या दोघांच्या नावाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. एवढंच नाही तर त्यांच्या या निर्णयानं त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. आमिरच्या कामाबद्दल बोलायचं तर तो सध्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ज्यात अभिनेत्री करिना कपूरचीही मुख्य भूमिका आहे.

























WhatsApp