Home गुन्हा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपीला दिल्ली येथे पुणे सायबर टीमकडून अटक

आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपीला दिल्ली येथे पुणे सायबर टीमकडून अटक

0
पुणे:परवेज शेख   हप्ता न भरल्याने बंद पडलेल्या विमा  पाॅलीसी सुरु करून देत असल्याचे बहाण्याने व पाॅलीसी मॅचुअर झाल्याने तिची मोठी रक्कम तुम्हाला मिळतील असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपीला दिल्ली येथे पुणे सायबर टीमकडून अटक नवी पेठ येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाने सन २०१६ ते सन २०१८ या दरम्यान वेगवेगळ्या कंपनीच्या विमा पाॅलीसी घेतल्या होत्या . त्यांचे हप्ते फिर्यादी भरले नव्हते . आरोपींनी फिर्यादी यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून ‘तुमच्या पाॅलीसी बजाज सर्व्हिसेस या आमच्या कंपनीने घेतल्या आहेत , त्या तुम्हाला चालू करता येतील ‘ असे खोटे सांगून व त्या साठी काही नवीन पाॅलीसी घ्याव्या लागतील असे सांगून तसेच तुमची पाॅलीसी मॅचुअर झाल्या आहेत , त्याचे तुम्हाला ८२,९५०००/- रु मिळणार आहेत असे आमिष दाखवून  टॅक्सची रक्कम भरावी लागेल, सर्व्हिस चार्जेस भरावे लागतील , त्याशिवाय तुम्हाला ८२,९५०००/- रु मिळणार नाहीत , तुम्ही आता भरत असणारी रक्कम ही रिफंडेबल आहे अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांना वेगवेगळ्या बॅंक अकाउंट्सवर पैसे भरण्यास सांगून फिर्यादीची एकूण २६ लाख ९५ हजार रुपयांची फसवणुक केली होती 

     सदर प्रकाराबाबत सायबर पो स्टे पुणे येथे गु र नं १६/२०१९ भादवि कलम ४१९,४२०,३४ सह माहीती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी) व ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलीस स्टेशन कडील स्टाफकडून त्याबबाबत तांत्रिक विश्लेषण करुन यामधील आरोपी नामे शामबाबू किशोरीलाल रा B-399 , मोतीनगर सुदर्शन पार्क , नवी दिल्ली यास डाबरी , दिल्ली येथे  सापळा रचून दि ०४/१०/२०१९ रोजी दुपारी १२:०० वा च्या सुमारास अटक केली आहे . त्याचेकडून एक मोबाईल फोन  , ०२ सीम कार्डस जप्त करण्यात आले आहे . त्यास मा. द्वारका न्यायालय,  दिल्ली यांनी दि ०८/१०/२०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . 
  सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे , पुणे शहर व मा. पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे , पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि मच्छिंद्र पंडित , सपोनि गंगाधर घावटे , पोना राजकुमार जाबा, मपोना दिपीका मोहीते,पोशि बाबासो कराळे, पोशि शाहरूख शेख यांच्या पथकाने केली आहे.
     सोशल नेटवर्किंग साईटवरून अशाप्रकारे स्वत:ची खरी आोळख लपवून गुन्हे करणाऱ्या टोळ्या विशेषत: उत्तर भारतातील राज्यांमधे कार्यरत आहेत तरी नागरीकांनी मोहास बळी पडून स्वत:ची फसवणूक करुन घेऊ नये असे आवाहन सायबर पोलीसांकडून करण्यात आले आहे.