‘आयफोन ११’ला ६.७ इंचाची स्क्रीन

- Advertisement -

नवी दिल्ली : 

अॅपलच्या पुढील आयफोनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी स्क्रीन असू शकते.’आयफोन ११’ मध्ये ६.७ इंच स्क्रीन असू शकेल अशी माहिती समोर आली आहे. २००७ मध्ये आयफोन लाँच झाला तेव्हा त्या फोनचा ३.५ इंच डिस्प्ले होता. तेव्हापासून आयफोनच्या स्क्रीनचा आकार सतत वाढत आहे. काही वर्षांपूर्वी ५ इंचाचा स्क्रीन सर्वात मोठी स्क्रीन मानली जात 

आयफोन एक्सएस मॅक्समध्ये ६.५ इंचाच्या डिस्प्ले देऊन २०१८मध्ये अॅपलने जगाला आश्चर्यचकित केले होते. ‘आयफोन ११’मध्ये मोठा डिस्प्ले दिसू शकेल. अॅपलचे विश्लेषक मिंग-ची-कुओ यांनी दावा केला की, आयफोन ५.४ इंच, ६.१ इंच आणि ६.७ इंच स्क्रीन आकारात येतील. यावर्षी येणारा नवीन आयफोन हा मागील वर्षीं आलेला आयफोन एक्सएस मॅक्सपेक्षा ०.२ इंच मोठा असू शकतो. आयफोन एक्सएसचा आकार ६.५ इंच आहे. आयफोन एक्सएस मॅक्सचा आकार ६.६७ इंच असू शकतो. जगातील सर्वात लोकप्रिय टॅब्लेट्सपैकी एक Google Nexus 7 मध्ये ७ इंच स्क्रीन आहे. गेल्यावर्षी फेमनिस्ट्स कडून अॅपलवर जोरदार टीका झाली होती. कारण आयफोन स्क्रीनच्या मोठ्या आकारामुळे हा स्मार्टफोन पकडण्यास त्रास होतो. यामुळे महिलांच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो, असा दावा करण्यात आला होता. 

- Advertisement -