Home गुन्हा आरे पोलिस ठाणे ची कामगिरी

आरे पोलिस ठाणे ची कामगिरी

0

मुंबई : शफीक शेख

वरिष्ठ पोलिस निरिक्षक नुतन पवार आरे पोलिस ठाणे .आरे पोलिस ठाणेगु.र क्र.- 168/ 19 भा द वि कलम 406,420,484,सह कलम (क)(ड)आयटी act सह 26,35 टेली ग्राफ act हा गुन्हा नोद केल्या बाबत ची माहिती प्रसारित करित आहे
दि.०६/०९/१९ रोजी पोउनि वाडीकर, पो.ना.९६१८८६/उगले, पो.शि.०६.१६४५/बडे, पो.शि.०८०४७७/भाबड हे आरे पो.ठाणेस रात्र -पाळी कर्तव्यास असताना इसम नामे श्री. किरण साळवी, २५ वर्षे यांनी पो.ठाणेस येवून कळविले की, त्यांना काही दिवसापासून एक महिला वाटस अँप वरून व्यवसायात पैसे गुंतवणूक करण्यासाठी संदेश व काँल करत असून पेपर व इतर कागदपत्रांची मागणी करत आहे. सदर महिलेने आज रोजी तिच्या मित्रास भेटून पेपर व पैसे देण्या- साठी आरे काँलनी- मध्ये बोलावले आहे.सदरची हकीगत ऐकून तात्काळ वरिष्ठांना माहिती देवून, यु.क्र.०५, आरे काँलनी, गोरेगाव येथे सापळा लावला असता, थोड्याच वेळात एक नायजेरियन इसम एका रिक्षातून येवून फिर्यादी यांचेजवळ येवून बोलणे करू लागला. सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून पो.ठाणेस आणून चौकशी केली असता सदरचा इसम हा स्वतः ची ओळख लप- वून वाटस अँप वरून फिर्यादीस फसवणूक करण्याच्या उद्देशाने संदेश पाठवत असल्याचे सांगितले. व वाटस अँप काँल करणारी महिला एंजेला असल्याचे सांगितले. सदरबाबत पो. ठाणेस गु.र.क्र.१६८/१९ क.४०६, ४२०, ३८४ ,३४भादवि सह ६६(क)(ड) आय.टी.अँक्ट सह २६,३५ टेलीग्राफ अँक्ट अन्वये गुन्हा नोंद केला,असून तपास चालू आहे.
सदर इसमाने मुंबई व पुणे येथील नागरिकांची अशाच पध्दतीने फसवणूक केल्याचे तपासात उघड होत आहे.अटक आरोपीचे नाव:—–
स्टीफन नाँबुझल वय ४० वर्षे, राठी- ५०१, वक्रतुंड अपार्टमेंट,लेन नं ०३, सांगवी,पुणे.

      *सदरची कारवाई ही मा. अप्पर पोलिस आयुक्त नार्थ रिजन सर श्री सावंत साहेब , मा.पोउआ परी-१२, श्री.स्वामी सो,मा.सपोआ श्री.जाधव सो, दिंडोशी विभाग, मा.वपोनि पवार मँडम, मा. श्री.पाटील (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली*