Home बातम्या आंतरराष्ट्रीय आर्थीक धाकधुकीला कोरोनाची बाधा?

आर्थीक धाकधुकीला कोरोनाची बाधा?

0

नवी दिल्ली : अर्थिक पातळीवर थोडी धाकधुकी दृष्टीक्षेपात असताना भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनना व्हायरसच्या अज्ञात धोक्‍याचा सामना करावा लागणार आहे, अशी भीती सरकारच्या सर्वोच्च सल्लगारांनी व्यक्त केली. काही हिरवळ उगवत असल्याचे दिसत आहे. पण, मी त्याबाबत सावधपणे आशावादी आहे, असे प्रतिपादन मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रह्मण्यम यांनी दिल्लीत दिलेल्या मुलाखतीत केले.

तेथे काही ज्ञात अज्ञात आणि अज्ञात अज्ञात असे अडथळे आहेत. अज्ञातांचे मॉडेल बनवणे अवघड आहे. विषाणूंनी चीनमधील वाढ रोखली. चिनबरोबरच जागतिक वाढीला या विषाणूंनी ग्रासले आहे. अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल अशी स्थिती आणण्यावर सरकार भर देत असताना हे आव्हान मोठे आहे. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था सहा ते साडेसहा टक्‍क्‍यांनी वाढेल, असा अंदाज आहे. यापुर्वी विकास दर पाच टक्‍क्‍यावर येईल असे सांगण्यात येत होते.

या विषाणूंमुळे विशेषत: चीनमध्ये काही अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. या साथीचा किती परिणाम होईल याचे मोजमाप करणे कठीन आहे. गेल्या सलग सहा तीमाहीत विकास दरात घट नोंदवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर अलीकडेच पर्चेसिंग मॅनेजरने केलेले सर्वेक्षण आशादायी चित्र निर्माण करत आहे. या आशेवर मध्यवर्ती बॅंकेने ग्राहकांच्या भावनाच्या सर्वेक्षणाने पाणी फेरले.
आम्ही विकासाच्या तळातून निश्‍चितपणे वर येऊ शकतो. मात्र याबाबत निश्‍चित काही भाष्य करण्यास थोडा काळ लागेल, असे ते म्हणाले.

कोरोना व्हायरस पहिल्या तीन महिन्यात जागतीक अर्थव्यवस्थेवर 280 अब्ज डॉलरचा फटका बसू शकतो, असे भाकीत कॅपिटल इकॉनॉमिक्‍सने केले आहे. मी कोरोनाच्या साथीने निर्माण केलेल्या साथीच्या परिस्थितीकडे जातीने लक्ष ठेवून आहोत. पण जर सार्सचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला नव्हता. तसेच आता होईल अशी अपेक्षा आहे, असे सुब्रह्मण्यम म्हणाले.