हायलाइट्स:
- रणबीर कपूर आणि आलिया भट बॉलिवूडधील हॉट कपल
- रणबीरने आलियाच्या आधी कतरीना, दीपिकाला केले होते डेट
- या तिघींच्याही आधी रणबीरच्या आयुष्यात होती गर्लफ्रेंड
कोण होती रणबीरची पहिली गर्लफ्रेंड?
रणबीर कपूरने सर्वात आधी अवंतिका मलिकला डेट केले होते. या दोघांचे सुमारे पाच वर्षे अफेअर सुरू होते. या दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर अंवितकाने आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इमरान खानशी लग्न केले. अर्थात सध्या इमरान खान आणि अवंतिका २०१९ पासून वेगळे रहात आहेत.
अवंतिकाने इमरानशी केले लग्न

रणबीर कपूर आणि इमरान खान हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. या दोघांच्या वयामध्ये केवळ एका वर्षाचे अंतर आहे. रणबीर कपूर आणि अवंतिका मलिक हे एकमेकांसोबत पाच वर्षे रिलेशनमध्ये होते. परंतु काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर अवंतिकाच्या आयुष्यात इमरान आला. त्यानंतर या दोघांनी २०११ मध्ये लग्न केले. या दोघांना एक मुलगी आहे. परंतु आता अवंतिका आणि इमरान एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.
रणबीर दीपिकाचे एक वर्ष अफेअर
रणबीरच्या आयुष्यात २००८ मध्ये दीपिका पादुकोण आली. दीपिकाने तिच्या मानेवर ‘आरके’ असा टॅटू देखील गोंदवला होता. ‘बचना ऐ हसीनों’ या सिनेमाच्या सेटवर या दोघांमधील प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यामुळेच हे लवकरच साखरपुडा करतील अशी त्यांच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होती. परंतु एका वर्षांमध्ये हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंह आला आणि या दोघांचे लग्न झाले.
दीपिकानंतर झाली कतरीनाची एंट्री

दीपिका आणि रणबीरचे ब्रेकअप झाल्यानंतर कतरीना त्याच्या आयुष्यात आली. २००९ मध्ये ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमाच्यासेटवर या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. २०१३ मध्ये या दोघांचे स्पेनमधील एकत्र असलेले फोटो समोर आले. २०१५ मध्ये रणबीरने कतरीना त्याला आवडत असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. परंतु २०१६ मध्ये या दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाला आणि ते वेगळे झाले. त्यानंतर अनेक पार्ट्यांमध्ये ते वेगवेगळे दिसले.
गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीसोबतच डेटिंग
कतरीना आणि आलिया या खूप छान मैत्रिणी आहेत. या दोघींच्या मैत्रीची चर्चा कायम असते. त्याचप्रमाणे आलिया आणि दीपिका देखील चांगल्या मैँत्रिणी आहेत. रणबीर कपूरच्या या प्रेमप्रकरणांमध्ये एक मोठा ट्विस्ट आला. तो म्हणजे कतरीनाशी २०१६-१७ मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरने २०१८ मध्ये आलियाशी सूत जुळवले. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करू लागले. त्यांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या. आता या दोघांनीही ते रिलेशनमध्ये असल्याचे जाहीर केले आहे. आता या दोघांचे लग्न निर्विघ्नपणे पार पडावे, अशी इच्छा या दोघांचेही चाहते व्यक्त करत आहेत.