Home शहरे पुणे आळंदीत फेरीवाल्यांचे होणार बायोमेट्रीक सर्वेक्षण

आळंदीत फेरीवाल्यांचे होणार बायोमेट्रीक सर्वेक्षण

0

आळंदी : राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार आळंदी नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद हद्दीतील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल ऍपद्वारे शनिवार (दि. 2) पासून सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली.

शहरातील विक्रेत्यांनी या सर्वेक्षणात नोंद करणे आवश्‍यक असून, त्यासाठी आधारकार्डला मोबाइल क्रमांक लिंक असणे अनिवार्य आहे.सर्वेक्षणासाठी आधार कार्ड, तहसीदार यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आरक्षित प्रवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र, अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र, विधवा असल्यास पतीचा मृत्यू दाखला, घटस्फोटित असल्यास प्रमाणीकरण प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करणे आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी फेरीवाल्यांनी नगरपरिषद टाऊन हॉल येथे दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्ष, सहाय्यक प्रकल्प अधिकारी वैशाली पाटील,समूह संघटक अर्जुन घोडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.