Home ताज्या बातम्या आव्हाडांच्या पुढाकाराने ठाण्यात चाचण्या;केवळ 450 रुपयात COVID-19 Test , 5 मिनिटात रिपोर्ट,

आव्हाडांच्या पुढाकाराने ठाण्यात चाचण्या;केवळ 450 रुपयात COVID-19 Test , 5 मिनिटात रिपोर्ट,

ठाणे : ‘कोव्हिड-19’ ची तपासणी महाग असल्याने अनेक गोरगरीबांना ही तपासणी करणे शक्य होत नाही. परिणामी, रुग्णांची अचूक संख्या मिळत नसल्याने कोरोनावर मात करणे अवघड होत आहे. त्यावर मात करण्यासाठी नाशिकच्या ईएसडीएस कंपनीने विकसीत केलेले तंत्रज्ञान आता ठाणे शहरातही आले आहे. त्यामुळे ठाण्यात आता कमी खर्चात कोरोनाची चाचणी करणं शक्य झालं आहे.

राज्यात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य सेनानी कावेरीताई पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष मिलींद पाटील यांनी हा उपक्रम कळवा येथे सुरु केला आहे. अवघ्या 450 रुपयांमध्ये ही टेस्ट करण्यात येणार असून अवघ्या पाच मिनिटांमध्ये त्याचा अहवालही मिळणार आहे.

सध्या ओमान, दुबई या देशांसह केरळ या राज्यात एक्स-रेद्वारे कोव्हिडची टेस्ट करण्यात येत आहे. तर, नाशिक महानगर पालिकेनेही हे तंत्रज्ञान स्वखर्चाने सुरु केले असून फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून एका व्हॅनद्वारे सबंध शहरामध्ये ही चाचणी नाशिक महापालिकेने सुरु केली आहे.

छातीच्या एक्स-रेचा अभ्यास करुन त्याद्वारे शरीरात गेलेल्या कोरोना विषाणू, त्याचे प्रमाण, टक्केवारी आदींची विस्तृत माहिती मिळवणे शक्य होत आहे. नाशिकमधील ईएसडीएस या कंपनीने या संदर्भात संशोधन केले होते. सुमारे 50 हजार लोकांच्या एक्स-रेची तपासणी करुन कोरोनाची चाचणी करण्यात या कंपनीला यश आले आहे. त्यामुळेच सध्या हे केरळमध्येही वापरण्यात येत आहे.

आता हेच तंत्रज्ञान गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य सेनानी कावेरीताई पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष मिलींद पाटील यांनी कळवा येथे आणले आहे.