Home शहरे आषाढी एकादशी निमित्त नांदेड विभागातून 06 विशेष गाड्या

आषाढी एकादशी निमित्त नांदेड विभागातून 06 विशेष गाड्या

नांदेड :     

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रे निमित्त नांदेड रेल्वे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे ने 06 विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आहे.यात्रे निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी भक्तांसाठी विशेष गाड्या सुरू करणार आहेत.ते खलील प्रमाणे

१. गाडी संख्या 07501 / 07502 आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद (2 फेऱ्या)

गाडी संख्या 07501 आदिलाबाद – पंढरपूर विशेष गाडी आदिलाबाद येथून दिनांक 11 जुलै, 2019 रोजी सकाळी 09.00 वाजता सुटेल, किनवट ला 10.14 वाजता, नांदेड दुपारी 13.05 वाजता, परभणी 14.27 वाजता, परळी 16.10 वाजता लातूर 19.10 वाजता निघून पंढरपूर येथे रात्री 23.30 वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी संख्या 07502 पंढरपूर ते आदिलाबाद हि विशेष गाडी दिनांक 13 जुलै 2019 पंढरपूर येथून सकाळी 05.30 वाजता सुटेल लातूर, परळी -13.30 , परभणी -15.05 , नांदेड ला 16.10 वाजता पोहोचेल आणि भोकर-17.22 , किनवट-19.22 मार्गे आदिलाबाद येथे रात्री 20.40 वाजता पोहोचेल. या गाडीला 10 डब्बे असतील.

२. गाडी संख्या 07515 / 07516 नगरसोल -पंढरपूर- नगरसोल (2 फेऱ्या)

गाडी संख्या 07515 नगरसोल– पंढरपूर विशेष गाडी नगरसोल येथून दिनांक 11 जुलै, 2019 रोजी सायंकाळी 17.30 वाजता सुटेल,रोटेगाव, परसोडा, लासूर मार्गे औरंगाबाद येथे 18.50 वाजता पोहोचून 19.05 वाजता सुटेल. जालना येथे 20.20 वाजता, परतूर, सेलू, मानवत रोड मार्गे परभणी येथून दिनांक 12 जुलै रोजी 00.50 वाजता सुटेल, पुढे गंगाखेड -01.45 , परळी- 02.45 वाजता सुटून लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी मार्गे हि गाडी पंढरपूर येथे दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 10.05 वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी संख्या 07516 पंढरपूर-नगरसोल हि विशेष गाडी पंढरपूर तेथून दिनांक 13 जुलै 2018 रोजी रात्री 23.50 वाजता सुटेल आणि दिनांक 14 जुलै रोजी परळी-07.00 , परभणी-08.30, जालना-10.54 , औरंगाबाद येथे सकाळी 11.40 वाजता पोहोचेल आणि 11.45 वाजता सुटून नगरसोल येथे दिनांक 14 जुलै रोजी दुपारी 13.30 वाजता पोहोचेल. या गाडीला 10 डब्बे असतील.

3. गाडी संख्या 07523 / 07524 अकोला-पंढरपूर-अकोला (2 फेऱ्या)

गाडी संख्या 07523 अकोला – पंढरपूर विशेष गाडी अकोला येथून दिनांक 11 जुलै, 2019 रोजी रात्री 20.10 वाजता सुटेल, वाशीम-21.25, हिंगोली-22.06 , पूर्णा-23.55 परभणी येथे दिनांक 12 जुलै रोजी 00.30 वाजता पोहोचेल. हि गाडी परभणी येथे नगरसोल-औरंगाबाद येथून येणाऱ्या गाडी संख्या 07515 या गाडीला जोडण्यात येईल. पुढे हि गाडी 07515 बनूनच पंढरपूर येथे सकाळी 10.05 वाजता पोहोचेल.परतीच्या प्रवासात हि गाडी परभणी पर्यंत 07516 बनूनच येईल आणि परभणी येथून अकोला कडे जाणारे डब्बे वेगळे करून गाडी संख्या 07524 रात्री 08.17 वाजता सुटेल आणि अकोला येथे दुपारी 13.15 वाजता पोहोचेल. या गाडीला 10 डब्बे असतील.सोबत गाडीचे वेळापत्रक जोडले आहे.आपणास विनंती आहे हि बातमी आपल्या वर्तमान पत्रातून या आषाढी विशेष गाड्यांची जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी.