Home शहरे परभणी “आ.विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून मौजे आसेगाव ता.जिंतूर येथे ब्रेस्ट कँसर व युटेरीन कँसर तपासणी व मोफत उपचार शिबिरास महिलांचा प्रचंड प्रतिसाद.”

“आ.विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून मौजे आसेगाव ता.जिंतूर येथे ब्रेस्ट कँसर व युटेरीन कँसर तपासणी व मोफत उपचार शिबिरास महिलांचा प्रचंड प्रतिसाद.”

जिंतूर (प्रतिनिधी): जिंतूर/सेलू विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकरी मजूर गरीब होतकरू महिलांना वेळे अभावी आरोग्याकडे लक्ष देणे होत नाही. तसेच लाजेपोटी अनेक महिला गंभीर आजार लपवतात तर अनेक महिलांना उपचार परवडणारे नसल्याने सदर महिला ब्रेस्ट कँसर (स्तनाचा कर्करोग)व युटेरीन कँसरकडे (गर्भ पिशवीचा कर्क रोग)दुर्लक्षित करत असतात. त्यामुळे महिलांचे आरोग्य बिघडत जाते.

त्यामुळे आ.विजय भांबळे यांनी महिलांची समाजसेवा करण्या हेतूने मोफत ब्रेस्ट कँसर व युटेरीन कँसरचे शिबीर आज दि. २१ जून रोजी मौजे आसेगाव येथे आयोजित केले होते. या शिबिरादरम्यान महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद होता. यावेळी 500 महिलांची तपासणी करण्यात आली तर 4० कँसर ग्रस्त महिला आढळून आल्या. त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे. यावेळी तज्ञ डॉ.परीक्षित ठाकूर (कर्करोग तज्ञ, दीपक हॉस्पिटल जालना), डॉ.निरंजन जहांगीरदार (कर्करोग तज्ञ), डॉ.पनाड (कर्करोग तज्ञ), डॉ.शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी), डॉ.बोराळकर (तालुका अधिकारी जिंतूर) यांनी काम पाहिले.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.आ.विजय भांबळे साहेब (जिंतूर सेलू विधानसभा) हे उपस्थित होते. शिबिराचे अध्यक्ष मा.सौ.उज्वलाताई राठोड (जि.प.अध्यक्षा), तर प्रमुख पाहुणे मा.सौ.इंदुमतीताई भवाळे (पं. स. सभापती जिंतूर), विजय खिस्ते (उपसभापती पं.स.जिंतूर), शालिनीताई राऊत (जि.प.सदस्या), मनोज थिटे (तालुकाध्यक्ष जिंतूर), प्रसादराव बुधवंत (विधानसभा अध्यक्ष जिंतूर – सेलू), रेखा संतोष भवाळ (पं.स.सदस्या) यांच्यासह अभिनय राऊत, सौ.सीमा पवार, विश्वंभर पवार,पांडुरंग पवार, राजेंद्र नागरे, उद्धवराव पवार, नागोराव गिराम, विष्णू पोंदाळ, भास्कर घुगे, सचिन राऊत, प्रकाश शिंदे, माउली गलांडे, बबलू कदम ई.उपस्थित होते.