Home ताज्या बातम्या इंजिनिअरचा शिर्डी -पुरी एक्स्प्रेस रेल्वे गाडीत अपंगाच्या बोगीत गळा आवळून खून

इंजिनिअरचा शिर्डी -पुरी एक्स्प्रेस रेल्वे गाडीत अपंगाच्या बोगीत गळा आवळून खून

0

इंजिनिअरचा शिर्डी -पुरी एक्स्प्रेस रेल्वे गाडीत अपंगाच्या बोगीत गळा आवळून खून

इंजिनिअर असलेल्या एका प्रवाशाचा गळा आवळून रेल्वेत खून झाल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकोला रेल्वेस्थानकावरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. हे फुटेज पोलिस तपासत असून, अपंगाच्या बोगीत कुणी चढउतार करताना दिसते काय, याचा तपास करणार आहेत. तसेच मनमाड आणि भुसावळ रेल्वेस्थानकावरीलही फुटेज ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ठाणेदार किरण सावळे यांनी दिली. 
अपंगाच्या बोगीमध्ये युवकाचा मृतदेह असल्याचे अकोल्यात कळले होते, असा दावा बडनेरा पोलिसांनी केला. त्यामुळे ही घटना आमच्या हद्दीत येत नाही. अकोला रेल्वेस्थानकाच्या हद्दीत येत असल्याने गुन्ह्याचे कागदपत्र बडनेरा पोलिसांनी अकोला पोलिसांकडे वर्ग केले आहेत. युवक हा मुंबई येथील बेलापूर येथे एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. शिर्डी -पुरी एक्स्प्रेस या गाडीत तो मनमाड येथून बसला असावा, असे त्याच्याकडे असलेल्या मनमाड ते बिलासपूर तिकिटावरून कळते. शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा आवळला असावा, असा तर्क लावण्यात आल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र असे असले तरी त्याच्या शरीरावर कोणत्याही खुणा नव्हत्या, अशी माहिती ठाणेदार सावळे यांनी दिली. शिर्डी-पुरी एक्स्प्रेसमध्ये पेशाने इंजिनिअर असलेल्या एका प्रवाशाचा गळा आवळून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती.याप्रकरणी अकोला रेल्वे पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेषकुमार श्रीपालसिंग चव्हाण (वय ३०, रा. लेहडरा. ता. मळमुक्तेश्वर जि. हापुल, उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. विशेषकुमार हा गाडी नंबर १८४०८ डाऊन शिर्डी पुरी एक्स्प्रेस गाडीच्या अपंगाच्या बोगीतून प्रवास करीत होता. प्रचासादरम्यान त्याचा खून करण्यात आला. विशेषकुमारचा मृतदेह बडनेरा रेल्वे पोलिसांनी गाडीतून बाहेर काढला. या युवकाजवळ मनमाड ते बिलासपूर असे तिकीट आढळून आले होते. बडनेरा पोलिसांनी या युवकाची ओळखही पटविली. त्यानंतर युवकाचे शवविच्छेदन केले असता त्यात युवकाचा मृत्यू गळा आवळून झाला असावा, असे समोर आल्याने पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळ हे अकोला रेल्वे स्थानकादरम्यान असल्याने बडनेरा पोलिसांनी अकोला रेल्वे पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला.