Home मनोरंजन इंडियन आयडल १२ : आनंदजींनी पनवदीपला या खास व्यक्तीसाठी गाणं गाण्याची केली फर्माईश

इंडियन आयडल १२ : आनंदजींनी पनवदीपला या खास व्यक्तीसाठी गाणं गाण्याची केली फर्माईश

0
इंडियन आयडल १२ : आनंदजींनी पनवदीपला या खास व्यक्तीसाठी गाणं गाण्याची केली फर्माईश

[ad_1]

हायलाइट्स:

  • इंडियन आयडल १२ च्या सेटवर फादर्स डे झाला साजरा
  • यावेळी पाहुणे म्हणून उपस्थित होते ज्येष्ठ संगीतकार आनंदजी
  • जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदजींनी मानले एका खास व्यक्तीचे आभार

मुंबई : इंडियन आयडल १२ हा रिअॅलिटी शो आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या कार्यक्रमात आता केवळ आठ स्पर्धक राहिले असून ते दर आठवड्याला सर्वोत्तम सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. इंडियन आयडल १२ कार्यक्रमाच्या आगामी भागात ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी आनंदजी या जोडीतील आनंदजी आपल्या पत्नीसह पाहुणे म्हणून उपस्थित होते.

इंडियन आयडल १२ कार्यक्रमाच्या आगामी भागात फादर्स डे साजरा केला आहे. कार्यक्रमातील सर्व स्पर्धक आपल्या वडिलांसाठी एक एक खास गाणे गायले आहे. या भागामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीतकार आनंदजी आणि त्यांची पत्नी शांताबेन शाह पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमातील सर्व स्पर्धकांनी सादर केलेली गाणी ऐकून आनंदजी आणि त्यांची पत्नी खूपच भारावून गेले. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील काही मजेशीर किस्से, घटना स्पर्धकांना सांगितल्या. यातील काही किस्से, काही घटना या आतापर्यंत कुणालाच माहिती नव्हत्या. ते ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले.

दरम्यान, कार्यक्रमात पवनदीप राजनने ‘जीवन से भरी तेरी आँखे’ हे गाणे गायले. त्याने गायलेले गाणे ऐकून आनंदजी खूपच भारावून गेले आणि जुन्या आठवणींमधून रमून गेले. या गाण्याबद्दलची खास आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

लिपस्टिक लावलेले प्रेमपत्र

आनंदजींनी सांगितले, ‘ त्याकाळात, माझ्या प्रशंसकांकडून आणि शुभचिंतकांकडून मला खूप सारी फुले आणि प्रेमपत्र यायची. एक प्रेमपत्र आले त्यामध्ये लिपस्टिकच्या खुणा होता आणि त्या पत्रावरून मला ‘जीवन से भरी तेरी आँखे’ या गाण्याला चाल सुचली होती,’ असे आनंदजी यांनी सांगितले.

आनंदजी यांनी पुढे सांगितले की, ‘माझा स्वभाव खूपच गंमतशीर आहे आणि मी खूप मस्ती करतो. अनेकदा पत्नीची देखील मस्करी करतो, तिला चिडवत असतो. परंतु एक मात्र नक्की की मला तिने भरभक्कम असा पाठिंबा दिला. करीअरच्या प्रत्येक टप्प्यामध्ये ती माझ्यासोबत सावली सारखी होती. यासाठी मी तिचे खूप खूप आभार मानतो…’ त्यानंतर आनंदजी यांनी त्यांच्या पत्नीला स्टेजवर बोलावले. त्यांचा हात हातात घेऊन पवनदीपला त्यांनी पुन्हा ‘जीवन से भरी तेरी आँखे’ हे गाणे गाण्याची विनंती केली. पवनदीपने गाणे गायला सुरुवात केल्यावर आनंदजींनी आपल्या पत्नीसोबत डान्स करायला सुरुवात केली. डान्स करताना हे दोघेजण खूपच भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. या दोघांमधील हे अनोखे बंध पाहून परीक्षकांसह सर्व स्पर्धकांनी उभे राहून त्यांना टाळ्यांच्या कडकडाट मानवंदना दिली.

[ad_2]

Source link