इंद्राणी बालन फाऊंडेशन-पुनित बालन ग्रुप कडून मदतीचा हात

- Advertisement -

पुणे : प्रतिनिध झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन लागू केल्या पासून देशभरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुण्यातही १८० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या आणि याठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे ओळखपत्र तपासले जात आहेत. लॉकडाऊन जाहीर केल्यापासून पुणे पोलिसांनी आतापर्यंत हजारो वाहने जप्त करून आपला खाकी दाखवला आहे. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवून एक स्मार्ट पोलिसिंग चा आदर्श दाखवला आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या हजारो जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे ग्रामीण या कार्यक्षेत्रात जवळपास पी-४ मधील ६०-६५ स्वयंसेवक मदतीला घेऊन.


सर्व ठिकणी नाकाबंदी मध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना ५०० बॉक्स पाणी वाटप केली आहे. अप्पर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे साहेब (पुणे शहर) तसेच सह-पोलीस आयुक्त श्री.रामनाथ पोकळे साहेब (पिंपरी-चिंचवड ) यांनी इंद्राणी बालन फाऊंडेशन-पुनित बालन ग्रुप चे कौतुक केले.

- Advertisement -