हायलाइट्स:
- आज पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल दरात ३१ पैसे वाढ झाली आहे.
- सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे.
- कच्च्या तेलाचा भाव सात आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. यापूर्वी मंगळवारी १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. तर बुधवारी पेट्रोल १९ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले होते.
करोनाविरुद्धच्या युद्धात RBI ची उडी; कर्जदारांसह अर्थव्यवस्थेसाठी केल्या मोठ्या घोषणा
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९७.३४ रुपये झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल ९०.९९ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.९० रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९१.१४ रुपये झाला आहे.
करोनाची उद्योग विश्वावर दहशत; दुसऱ्या लाटेने ७५ लाख नोकऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
पेट्रोलप्रमाणेच आज डिझेलच्या दरात देखील सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे.आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ८८.४९ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८१.४२ रुपये झाला आहे. चेन्नईत डिझेल ८६.३५ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८४.२६ रुपये प्रती लीटर झाले आहे.
जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मात्र तेजी कायम आहे.कच्च्या तेलाचा भाव सात आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे.अमेरिकन कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडच्या दरात ०.५४ डॉलरची वाढ झाली आहे. तेलाचा भाव ६८.४२ डॉलर प्रती बॅरल झाला. तर यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.५७ डॉलरने वधारला आहे. तो ६५.०६ डॉलर प्रती बॅरल झाला.
कमॉडिटी बाजारात पडझड सुरुच ; सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा झाली घसरण
देशात गेल्या २४ तासांत नोंद झालेल्या आकडेवारीनं आजवरचे करोना संक्रमणाचे सगळे रेकॉर्ड तोडलेत. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी (५ मे २०२१) एकूण ४ लाख १२ हजार २६२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ३९८० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल ३ लाख २९ हजार ११३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी १० लाख ७७ हजार ४१० वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ३० हजार १६८ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३५ लाख ६६ हजार ३९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.