Home मनोरंजन ‘इतकी लोकप्रियता मिळूनही तूला कसलाच गर्व नाही’, ‘देवमाणूस’ किरणसाठी मित्राची कौतुकास्पद पोस्ट

‘इतकी लोकप्रियता मिळूनही तूला कसलाच गर्व नाही’, ‘देवमाणूस’ किरणसाठी मित्राची कौतुकास्पद पोस्ट

0
‘इतकी लोकप्रियता मिळूनही तूला कसलाच गर्व नाही’, ‘देवमाणूस’ किरणसाठी मित्राची कौतुकास्पद पोस्ट

[ad_1]

हायलाइट्स:

  • ‘देवमाणूस’ मालिकेत किरण साकारत आहे नकारात्मक पात्र
  • पोस्ट शेअर करत एकनाथने किरणच्या वागण्याचं केलं कौतुक
  • लोकप्रियता मिळूनही किरणने आपले पाय जमिनीवर ठेवले- एकनाथ

मुंबई– छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका ‘देवमाणूस‘ मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणारा डॉक्टर अजितकुमार देव म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड चाहत्यांचा प्रचंड लाडका झाला आहे. कार्यक्रमातील किरणची भूमिका जरी नकारात्मक असली तरी प्रेक्षक मात्र किरणवर भरभरून प्रेम करत आहेत. यापूर्वी किरणने साकारलेल्या ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील भैय्यासाहेबांचं पात्रही प्रेक्षकांनी उचलून धरलं होतं. आताही किरणला प्रेक्षकांकडून तितकंच प्रेम आणि आपलेपणा मिळत आहे. इतकं सगळं असूनही किरणचे पाय अजूनही जमिनीवर आहेत, असं म्हणत किरणच्या एका खास मित्राने त्याचं कौतुक केलं आहे.


‘देवमाणूस’ मालिकेत रेश्माच्या पतीची भूमिका साकारणारा अभिनेता एकनाथ गीते याने किरणसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने किरणचं कौतुक करत लिहिलं, ‘इण्डस्ट्रीचं कुठलंही बॅकग्राऊंड नसताना एक साधा मुलगा झी मराठीचा ‘देवमाणूस’ होऊ शकतो. फक्त हिरो आणि विलन होऊन तो थांबत नाही, तर झीचे तीन पुरस्कारही घेतो आणि त्याच्या या यशाबद्दल त्याला काही विचारलं तर तो म्हणतो, ‘ही तर सुरुवात आहे आपली, अजून ‘खूप’ काही करायचंय.’ नेहमी पॉझिटिव्ह विचारांनीच कसा बोलत असेल हा? सगळं पॉझिटिव्हचं बोलणं कसं असतं याचं? याला अगदी कुठल्याही परिस्थितीच इतकं शांत कसं राहता येतं? आणि गोष्टी दुर्लक्षित कशा करता येतात? इतक्या प्रसिद्धीनंतरही इतकं साधं कसं राहता येतं? असे कितीतरी प्रश्न पडतात मला.’

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटमधील ‘त्या’ व्याक्यानं नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या


किरणच्या वागण्यातील मोठेपणा सांगत एकनाथने लिहिलं, ‘एका मोठ्या दिग्दर्शकाने मला सांगितलं होतं की, ‘कलाकार आतून जेवढा शांत असतो तो बाहेर तेवढ्याच ताकदीने विस्फोटक होतो.’ हे वाक्य तुझ्याकडे बघून १०० टक्के खरं सिद्ध होतं भावा. मला आणि माझ्यासारख्या खेड्या-पाड्यातून, चिखला-मातीतून येणाऱ्या असंख्य कलाकारांना स्वप्न बघायला बळ मिळतं तुझ्यामुळे. मागच्या वर्षभरात खूप काही शिकलोय तुझ्याकडून. आता ते शांत राहणं आणि गोष्टी दुर्लक्षित करणं तेवढं शिकव बाबा एकदा, म्हणजे माझा अभ्यास पूर्ण होईल. वाढदिवसाच्या परभणीपासून पुण्यापर्यंत शुभेच्छा भावा तुला. मोठा हो वगैरे असं काही म्हणणार नाही मी, कारण मला माहितीये की पुढच्या दोन- तीन वर्षात तू ‘तिथे’ जाऊन पोहचलेला असशील. खूप सारं प्रेम आणि बाकी रात्री बोलूया पार्टी करताना.’ अशा गोड शब्दात एकनाथने किरणची पाठ थोपटली आहे.

किती होता विद्या बालनचा पहिला पगार? वाचा मजेशीर किस्सा



[ad_2]

Source link