हायलाइट्स:
- तैमूरच्या लोकप्रियतेमुळे बॉलिवूडमधून येत होत्या जाहिरातींच्या ऑफर
- करिनाने तैमूरच्या जाहिरातींसाठी सैफला दिला होता नकार
- तैमूरला मिळणाऱ्या पैशातून परदेशी फिरायला जाणार होता सैफ
‘पॉर्न’ व्हिडीओ निर्मिती प्रकरणात नवऱ्याला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीनं घेतला मोठा निर्णय
एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सैफने या गोष्टीचा खुलासा केला होता. तैमूरसाठी अनेक जाहिरातींच्या ऑफर येत होत्या. शिवाय सैफ ज्या चित्रपटांमध्ये काम करायचा त्या चित्रपटांचे निर्मातेदेखील सैफकडे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तैमूरला आणायची गळ घालत. सैफ त्यासाठी नेहमीच तयार असे. परंतु, याबाबतीत सैफने करिनाला विचारणा केली असता तिने तैमूरला घेऊन जाण्यास साफ नकार दिला. सैफ म्हणाला, ‘मी तैमूरला चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी घेऊन जाण्याबद्दल करिनाला विचारलं. तिने मला स्पष्ट शब्दात सांगितलं की, पैसे कमावण्यासाठी माझ्या मुलाचा वापर करायचा नाही. इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नकोस. त्यावेळेस ती माझ्यावर खूप भडकली होती.’
सैफने सांगितल्याप्रमाणे, तैमूरची लोकप्रियता सैफच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी योग्य ठरली असती. सैफने तर ‘कलाकांडी’ चित्रपटासाठी तैमूरला रबर बँड घालायचा आणि ‘हंटर’ साठी नागा साधूंप्रमाणे विग लावण्याचा देखील विचार केला होता. परंतु, करिनाच्या एका निर्णयाने सैफ यापैकी काहीच करू शकला नाही. तैमूरने जर जाहिराती केल्या असत्या तर त्यातून येणाऱ्या पैशातून सैफने परदेशात फिरायला जायचं ठरवलं होतं. सैफ ते पैसे तैमूरला मुळीच देणार नव्हता. परंतु, करिनामुळे त्याची स्वप्न पूर्ण होऊ शकली नाहीत.