Home मनोरंजन ‘इतिहास पुन्हा जिवंत करण्याची मोठी जबाबदारी’, शिवा काशिद साकारण्याबद्दल विशाल निकम म्हणतो…

‘इतिहास पुन्हा जिवंत करण्याची मोठी जबाबदारी’, शिवा काशिद साकारण्याबद्दल विशाल निकम म्हणतो…

0
‘इतिहास पुन्हा जिवंत करण्याची मोठी जबाबदारी’, शिवा काशिद साकारण्याबद्दल विशाल निकम म्हणतो…

[ad_1]

हायलाइट्स:

  • विशाल निकम साकारतोय शिवा काशिद
  • ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत साकारली होती मुख्य भूमिका
  • शिवा काशिदच्या भूमिकेला न्याय देण्याची मोठी जबाबदारी

मुंबई– स्टार प्रवाह मालिकेवर सुरू होणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी‘ मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता विशाल निकम त्याच्या मालिकेतील भूमिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा‘ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचणाऱ्या विशालने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शिवाजी महाराजांचा मावळा साकारताना अभिमान वाटत असल्याचं म्हटलं. शिवा काशिद ही भूमिका साकारताना आपल्याला उत्कृष्ट काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्याने वाहिनीचे आभार मानले.

कोण ठरणार इंडियन आयडलचा विजेता? १२ तास चालणार ग्रँड फिनाले

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विशाल म्हणाला, ‘मी खूप नशीबवान आहे की वाहिनीने मला हे पात्र साकारण्याची संधी दिली. यापूर्वी मी ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत काम केलं. तेव्हाही प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. आता माझ्यावर ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेतील शिवा काशिद हे पात्र साकारायची जबाबदारी आहे. स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या हजारो मावळ्यांपैकी एक असलेल्या शिवाचा इतिहास प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे. आतापर्यंत शिवा काशिद याच्या पराक्रमाचे किस्से आपण ऐकले होते. आता प्रेक्षकांना तो इतिहास पडद्यावर पाहता येणार आहे.’

मालिकेतील पात्राला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगत विशाल म्हणाला, ‘शिवाजी महाराजांचं कार्य फार मोठं आहे. त्यांच्या मावळ्यांची त्यांना असणारी साथ ही गोष्ट महाराजांसाठी फार महत्वाची होती. शिवाने दिलेलं बलिदानही प्रचंड आहे. त्यामुळे माझ्या खांद्यावर शिव काशिदच्या पात्राला न्याय मिळवून देण्याची खूप मोठी जबाबदारी आहे.’ शिवा काशिदने पन्हाळा किल्ल्यावर अडकलेल्या शिवाजी महाराजांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी स्वतःचे प्राण दिले. महाराज्यांच्या जागी त्यांचा वेष घेऊन शिवाने सिद्दीच्या सैन्याला गुंगारा दिला होता. विशालप्रमाणे अभिनेते अजिंक्य देव देखील मालिकेत बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

प्रेक्षकांना धक्का; या तीन आवडत्या मालिका लवकरच घेणार निरोप?

[ad_2]

Source link