Home मनोरंजन इरफान खानच्या मुलानं बाबिलनं अर्ध्यावर सोडलं शिक्षण, कारण..

इरफान खानच्या मुलानं बाबिलनं अर्ध्यावर सोडलं शिक्षण, कारण..

0
इरफान खानच्या मुलानं बाबिलनं अर्ध्यावर सोडलं शिक्षण, कारण..

[ad_1]

हायलाइट्स:

  • इरफान खानच्या मुलाने बाबिलने घेतला हा मोठा निर्णय
  • सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मित्रांना, चाहत्यांना दिली ही बातमी
  • बाबिलच्या धाडसी निर्णयाचे होतेय कौतुक

मुंबई : बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता म्हणून दिवंगत इरफान खान हे ओळखले जायचे. बॉलिवूडमधील गुणी आणि मेहनती अशा अभिनेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाच्या क्षेत्रामध्ये येत आहे. बाबिलला ‘काला’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी देखील दिसणार आहे.

लहान असल्यापासूनच बाबिलला अभिनयाच्या क्षेत्रात काम करायचे होते. त्यामुळेच गेल्या वर्षी बाबिलने लंडनमधील सिनेमाचे तंत्रशुद्ध अभ्यासक्रम शिकवणाऱ्या युनिवर्सिटी ऑफ वेस्ट मिनिस्टर या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. परंतु आता त्याने हा अभ्यासक्रम मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या कॉलेजमधील त्याच्या मित्रांसाठी बाबिलने एक नोट त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.


या नोटमध्ये बाबिलने लिहिले की, ‘मी तुम्हा सर्वांना खूप मिस करणार आहे. मुंबईत माझे अवघे दोन-तीनच मित्र आहेत. लंडनच्या थंडगार वातावरणात तुम्ही सर्वांनी मिळून प्रेमाची ऊब मला दिली होती. त्यामुळे आपल्याच घरी असल्याची भावना कायम माझ्या मनात होती. तुम्ही माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल मी तुमचा आभारी आहे. १२० पेक्षा जास्त क्रेडिट्स मिळूनही मी फिल्म बीए अभ्यासक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आता मला पूर्ण वेळ अभिनयाच्या क्षेत्रात काम करायचे आहे. गुडबाय युनिवर्सिटी ऑफ वेस्टमिनिस्टर… माझ्या खऱ्या खुऱ्या मित्रांना खूप सारे प्रेम.’ अशी नोट लिहित कॉलेजमधील अनेक मित्रांना त्याने टॅग केले आहे. या नोटसोबत बाबिलने त्याचा अभ्यासक्रमात काम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे.


दरम्यान, बाबिल लवकरच ‘काला’ या सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. याशिवाय त्याला आणखी एक सिनेमा मिळाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शूजीत सरकार करत आहे. शूजीत आणि इरफान यांनी ‘पीकू’ सिनेमात एकत्र काम केले होते. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण हे देखील होते.



[ad_2]

Source link