इराण-अमेरिका तणवाचे सोन्याच्या भावात परिणाम, सोने महागले

- Advertisement -

 नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यात वाढत्या तणावाचा परिणाम सोन्याच्या भावात दिसून येत आहे. बुधवारी इराणने अमेरिकेच्या इराकमधील सैन्याच्या तळांवर हल्ला केल्याची वार्ता कळताच सोन्याच्या किंमती वेगाने वाढू लागल्या आहेत. इंदूर सराफा बाजारात सोन्याचे दर 250 रूपये महाग होऊन ते प्रती दहा ग्राम 41,425 रुपये झाले. त्याच वेळी, एमसीएक्सवरील सोन्याचे दर सुमारे 615 रुपयांनी वाढून विक्रमी 41, 278 प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचप्रमाणे इंदूर सराफा येथे चांदी 350 रुपयांनी स्वस्त झाली आणि 48,300 रुपये प्रतिकिलोवर विकली गेली.

यापूर्वी मंगळवारी दिल्लीच्या प्रमुख सराफा बाजारात मंदी होती. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 420 रुपयांनी घसरून 41,210 रुपयांवर आला. चांदीही 830 रुपयांनी घसरून 48,600 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. सोमवारी सोन्या-चांदीमध्ये प्रचंड वाढ झाली. तज्ज्ञांच्या मते डॉलरच्या तुलनेत रुपयाला मजबुती आणि नफा बुकिंगमुळे सोन्याच्या किमतीत घट दिसून आली. जागतिक बाजारात सोन्याची विक्री 1,568 डॉलर आणि चांदी 18.39 डॉलर प्रति औंस (28.35 ग्रॅम) झाली.

- Advertisement -