Home गुन्हा इसिसशी संबंध ठेवणार्‍या 160 जणांना अटक, 27 गुन्हे दाखल

इसिसशी संबंध ठेवणार्‍या 160 जणांना अटक, 27 गुन्हे दाखल

नवी दिल्ली:

एनआयए आणि राज्य पोलिसांनी इसिसशी संबंधित आणि त्यांच्याशी सहानुभुती असलेल्या लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत देशभरात एकूण 160 जणांना अटक करण्यात आली आहे. दक्षिणेकडील राज्यांसह सर्व अनेक राज्यातील लोकांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दहशताविरोधात हिंदुस्थान सरकारने कडक पावलं उचलली असून इसिसच्या सदस्यांनाच नव्हे तर ज्यांना या संघटनेबाबत सहानुभुती वाट त्यांनाही सरकारने चांगलाच हिसका दाखवल आहे.

इसिस ही दहशतवादी संघटना असून इराक आणि सीरियामध्ये संघटनेने हैदोस घातला आहे. ही संघटना इंटरनेचे साहाय्याने आपली विचारधारा देशात पसरवू पाहत आहे. त्यामुळे देशातील गुप्तचर संस्थांनी या कारवाईवर बारीक लक्ष ठेवून कायदेशीर कारवाई केली आहे.

या प्रकरणी एनआयएने इसिसस संबंधित 27 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 160 जणांना अटक केली आहे. एकूण 27 गुह्यांपैकी 18 गुन्हे हे दक्षिण हिंदुस्थानातले असून या प्रकरणी 56 लोकांना अटक करण्यात आली आहे.