Home ताज्या बातम्या ईडीच्या धाडींनंतर देशमुख बोलले; परमबीर यांच्यावर केले गंभीर आरोप

ईडीच्या धाडींनंतर देशमुख बोलले; परमबीर यांच्यावर केले गंभीर आरोप

0
ईडीच्या धाडींनंतर देशमुख बोलले; परमबीर यांच्यावर केले गंभीर आरोप

हायलाइट्स:

  • ईडीच्या धाडीनंतर अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरण
  • परमबीर सिंग यांच्यावर साधला निशाणा
  • चौकशीला सहकार्य करणार असल्याचंही दिलं स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीकडून छापे मारण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया (Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh Reaction On ED Raid) दिली आहे. तसंच आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

‘परमबीर सिंग यांनी मुंबई पोलिस आयुक्त पदावर असताना माझ्यावर आरोप केले नाहीत. मात्र सिंग यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आयुक्तपदावरून दूर करण्यात आलं आणि त्यांनंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले. त्यांना माझ्यावर आरोप करायचेच होते तर त्यांना आयुक्त पदावर असताना आरोप का केले नाहीत?’ असा सवाल अनिल देशमुख यांनी केला आहे.

Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीत धुसफूस; कोल्हापूर ‘झेडपी’त राजकारण तापलं

परमबीर सिंग यांच्यावर आरोप

‘उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली. या प्रकरणात सामील असणाऱ्या सचिन वाझेसह विनायक शिंदे आणि इतर सर्व वादग्रस्त अधिकारी परमबीर सिंग यांनाच रिपोर्टिंग करत होते. यातील बहुतांशी अधिकारी आता तुरुंगात आहेत. त्यामुळे परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद असल्याने आम्ही त्यांना पदावरून दूर केलं आणि याच कारणातून त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले,’ असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, ‘याप्रकरणी चौकशीनंतर सत्य बाहेर येईल. मी यापुढेही सर्व प्रकारच्या चौकशीला सहकार्य करणार आहे,’ असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

Source link