Home गुन्हा ई – पास मिळवून देणाऱ्या टोळीला अटक करायला युनिट- 7 यश! लॉक डाऊन काळात जिल्हांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींना गैरप्रकारे

ई – पास मिळवून देणाऱ्या टोळीला अटक करायला युनिट- 7 यश! लॉक डाऊन काळात जिल्हांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींना गैरप्रकारे


मुंबई :- शफीक शेख
कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्याकरिता सरकारने मुंबई शहरात लॉकडॉउन सुरू केला. याकाळात एखाद्या व्यक्तीला जिल्हातर्गत प्रवास करण्या करिता ई-पास बंधनकार केला होता. हा बोगस ई – पास मिळवून देणाऱ्या दोघांना युनिट सात ने अटक केली आहे.

मुंबई मधून परजिल्ह्यात मेडिकल करण्या करिता जाण्याकरिता आवश्यक असलेला ई – पास पैसे घेऊन खोट्या माहिती आधारे एक मोबाईल धारक मिळवून देत असल्याचे माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांना मिळाली असल्याने त्यांनी ही शासकीय यंत्रणेची फसवणूक असल्याचे वरिष्ठ अधिकारी यांना दिली. त्यांनी याबाबत महिती काढण्यास लावले.

पोलीस निरीक्षक मनीष श्रीधरन हे बोगस ग्राहक बनून आरोपीच्या मोबाईलवर संपर्क केला. आणि सोलापूरला जाण्याकरिता दोन माणसाचा ई पास काढून देशील का?याबाबत विचारणा केली. आरोपीने सर्व पेपर तसेच ई पास काढण्याकरिता पाच हजार व वैद्यकीय प्रमानपत्र नसेल तर एक हजार रुपयांत काढून देईन एकूण 6000 रुपये घेणार असे सांगितले. त्यानुसार पो. नि श्रीधरन यांनी इंटरनेट बँकिंग ने 1000 रुपये खात्यावर पाठविले नंतर 5000 हा पास रात्री 10 भांडुप मधील एका व्यक्तीकडे पास देतो असे आरोपीने सांगितले.त्यानुसार उपनिरीक्षक संजय सुर्वे यांनी आपल्या कर्मचाऱ्या सहित सापळा रचला.

आरोपी रात्री 11.वाजता गाडी घेऊन आला. पोलीस चालक धुमाळे यांनी आपल्या नांवाचा असलेला ई – पास घेऊन उर्वरीत 5000 रुपये दिले. त्याच वेळेचं सापळा रचून बसलेले पोलीस यांनी त्याला ताब्यात घेतले.

सह पोलीस आयुक्त ( गुन्हे ) विनायकर चौबे,पोलीस उपायुक्त ( प्रकटीकरण – 1 ) अकबर पठाण,स. उपआयुक्त डी ( पूर्व ) अविनाश शिगटे, प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीष श्रीधरन, स.पो.नि संतोष मस्तुद, महेंद्र दोरकर, पो.उ.नि संजय सुर्वे, पो.ह बिपीन सावंत, पोलीस चालक बिपीन धुमाळ, पो. ना मुरलीधर सपकाळे, पो. शी नामदेव चिले, लुकमान सयद, दिनेश शिगोटे, संतोष धुमाळे, चरण सिंग गुसिंगे यानी कारवाई करिता सहभाग घेतला होता.