उदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, संजय राऊतांचा हल्लाबोल

- Advertisement -

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे. उदयनराजे यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, अशा शब्दांत संजय राऊत संजय राऊतांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. दैनिक लोकमत पत्रकारिता पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत संजय राऊत बोलत होते.

या मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे यांच्यावर जोरदार टीका केली. उदयनराजे हे साताऱ्याचे माजी खासदार आहेत. आता ते भाजपचे नेते आहेत. दसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचे वंशज आहेत. उदयनराजेंनी काही मंगळवारी संजय राऊत आणि शिवसेनेवर टीकास्त्र साधले होते. शिवसेना हे नाव ठेवताना तुम्ही शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारले होते का? असा सवाल त्यांनी केला होता. यावर आता संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांना आम्ही जाणते राजे मानतो तर उदयनराजे ना राजे मानतो. शरद पवार हे जाणते राजे जनतेने उपाधी दिली आहे. तर हिंदू हृदयसम्राट ही उपाधी बाळासाहेबांना जनतेने दिली आहे. रयतेचा राजा लूटमार करणारे राजे होऊ शकत नाहीत. अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी उदयनराजे यांना टोला लगावला.

- Advertisement -