Home बातम्या राजकारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल : नीलम गोऱ्हे

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल : नीलम गोऱ्हे

सोलापूर: आगामी मी निवडणुकीनंतर महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री पद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मिळाले तर आम्हाला आनंद होईल असं मत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.

आषाढी एकादशी निमित्त नीलम गोऱ्हे या सोलापूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. पंढरपूर येथील पांडुरंगाचे दर्शन घेऊन च्या शुक्रवारी दुपारी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल यावर उद्धव ठाकरे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होऊन निर्णय होईल. युवकांना राजकारणात प्रेरणा मिळावी यासाठी आदित्य ठाकरे हे विधानसभेत आले तर एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल. असही नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या विधवा पत्नीचा पुनर्वसन करण्यासाठी लवकरच विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आला आहे. राज्यातील महिलांच्या सार्वजनिक शौचालयासाठी आपला प्रयत्न असणार आहे. आजवर पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली. मिळालेल्या पदांपेक्षा ‘मातोश्री च नातं’ हे पद माझ्यासाठी खूप मोठं आहे. असंही ही त्या यावेळी म्हणाल्या.

पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश कोठे, पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, प्रताप चव्हाण, नगरसेवक गणेश वानकर, अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते.
————
एनजी मिलचा अभ्यास करू…
नरसिंग गिरजी मिलच्या विषयावर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाले की, नियमानुसार एखादी मिल बंद पडली तर त्याची जागा ही मिलची जागा कामगारांना दिली जाते. नरसिंगमिलबद्दल मला कल्पना नाही, पण ही मिल कोणत्या कारणासाठी पाडली जाणार आहे याची याबाबत माहिती घेतली जाईल़ पुरातत्व खात्याकडून याची माहिती घेतली जाईल असेही यावेळी नीलम गोऱ्हे यांनी सांगितले़