हायलाइट्स:
- मंदिरा बेदीचा पती राज कौशल यांचं ३० जून रोजी झालं आकस्मित निधन
- सोशल मीडियावर नेहमीच खूप सक्रिय असायचे राज कौशल
- काही महिन्यांपूर्वीच शेअर केलेली राज कौशल यांची एक पोस्ट ठरली खरी
Photos- पत्नी मंदिरा आणि दोन मुलांना मागे सोडून गेले राज कौशल
राज कौशल सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. ते नेहमीच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असत. निधनाच्या एक दिवस अगोदरच त्यांनी घरी मित्रपरिवारासोबत पार्टी केली होती. त्याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. नुकत्याच झालेल्या या पार्टीमध्ये नेहा धूपिया, अंगद बेदी, जहीर खान, सागरिका घाटगे, आशीष चौधरी यांच्यासह इतर कलाकारांचाही समावेश होता. हे फोटो शेअर करताना राज यांनी त्यांना, ‘सुपर संडे, सुपर फ्रेंड्स, सुपर फन’ असं कॅप्शन दिलं होतं. अर्थात ही त्यांची अखेरची पोस्ट असेल असं त्यांनाही वाटलं नसेल. अशाच राज कौशल यांच्या निधनानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
राज कौशल इन्स्टाग्रामवर नेहमीच मित्रासोबत पार्टी करतानाचे किंवा फॅमिलीसोबत एन्जॉय करतानाचे फोटो शेअर करत असत. पण काही महिन्यांपूर्वी म्हणजेच ३० एप्रिल रोजी राज कौशल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. जी अखेर खरी ठरली. आपल्या पोस्टमध्ये राज कौशल यांनी लिहिलं, ‘उद्याचा दिवस कोणी पाहिला आहे. आज जगून घ्या. एकच आयुष्य आहे.’ त्यावेळी राज यांनी कल्पना देखील केली नसेल की, काही महिन्यातच ते स्वतःच या जगाचा निरोप घेणार आहेत.
पतीच्या जाण्याने तुटली मंदिरा बेदी, रोनित रॉयने दिला धीर
मागच्या काही काळापासून राज कौशल ‘अक्कड बक्कड’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. एका आठवड्यापूर्वीच त्यांनी या वेब सीरिजचं शूटिंग पूर्ण केलं होतं आणि त्यानंतर रॅपअपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या सर्वच फोटोंमध्ये राज कौशल खूपच आनंदी दिसत आहेत. राज यांनी ‘शादी के लड्डू’, ‘एंथनी कौन है’, ‘प्यार में कभी कभी’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय जाहिरात विश्वातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.