प्रतिनिधी – शफीक शेख
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा रविवारी ३१ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन वाढवणार का? किंवा यात काही शिथिलता आणून सूट देण्यात येईल यावर चर्चा सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांसी संवाद साधणार आहेत. सकाळी ११ वाजता नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ला सुरुवात होईल. ३१ मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्पा संपत अल्याने नरेंद्र मोदी नेमकी काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
- Advertisement -