उद्योगमंत्री:इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र योग्य ठिकाण

- Advertisement -

मुंबई: इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्राच्या वाढीसाठी महाराष्ट्र शासनाचे विशेष धोरण आहे. याशिवाय या उद्योगासाठी विविध प्रोत्साहने दिली जात आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

केंद्र शासनाने तयार केलेल्या इन्व्हेस्ट इंडिया फोरमद्वारे इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग (इएसडीएम) या क्षेत्रातील गुंतवणुकीवर आज विविध राज्याच्या प्रतिनिधींसोबत ऑनलाइन चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली.

देसाई म्हणाले की, महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात कायम अग्रेसर राज्य आहे. येथे मिळणाऱ्या सर्व सुविधांमुळे देश विदेशातील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. देशाच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३३ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होते.

सध्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटला मोठी मागणी असल्याने या क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने या क्षेत्रासाठी विशेष धोरण तयार केले आहे. याशिवाय इंटरनेट, डेटा सेंटर्स, विकास व संशोधन केंद्र मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे देश-विदेशातील गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राला पसंती द्यावी, असे आवाहन श्री.देसाई यांनी केले.

राज्यात ५१ हजार उद्योग सुरू
दरम्यान, इंडिया मर्चंट चेंबर्सच्या वेबिनारमध्ये देसाई यांनी उद्योगाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात सध्या ५१ हजार उद्योग सुरू झाले आहेत. १३ लाख कामगार या ठिकाणी रुजू झाले आहेत. छोट्या व मध्यम उद्योगांसाठी राज्य शासन

- Advertisement -