Home बातम्या राष्ट्रीय उद्रेक हा शब्दसुद्धा काढू नका; संभाजीराजेंचं मराठा समाजाला आवाहन

उद्रेक हा शब्दसुद्धा काढू नका; संभाजीराजेंचं मराठा समाजाला आवाहन

0
उद्रेक हा शब्दसुद्धा काढू नका; संभाजीराजेंचं मराठा समाजाला आवाहन

कोल्हापूरः मराठा आरक्षण अवैध असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर संभाजी राजे यांनी मराठा समाजाला एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

‘सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने जोमाने बाजू मांडली. केंद्र सरकारनेही सर्वतोपरी प्रयत्न केलं. त्यामुळं कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मी आदर करतो, असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. तसंच, आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे,’ असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.

‘मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळं त्यांनी मराठा समाजाला संयम ठेवण्याचे आवाहन केलं आहे. तसंच, करोनाची महामारी आहे कोणीही उद्रेक करु नका. आपली लोकं जगली पाहिजेत. करोनामुळं संयम ठेवा,’ असं आवाहन संभाजीराजेंनी समाजाला उद्देशून केलं आहे.

BREAKING: मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

‘आधीच्या सरकारनेही जोमानं बाजू मांडली होती. या सरकारनंही चांगली बाजू मांडली होती. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यावर आपण काही बोलू शकत नाहीय, असंही ते म्हणाले. बाकीच्या राज्यांना ५० टक्क्यांवर आरक्षण दिलं गेलं, महाराष्ट्राला दिलं गेलं नाही ही समाजाच्यावतीने दुर्दैवी बाब आहे,’ असंही त्यांनी नमूद केलं आहे.

‘समाजानं जगाला दाखवून दिलं आरक्षणाची किती गरज आहे. शांतताप्रिय मोर्चे काढले. जगाला आम्ही दाखवून दिलं होतं मोर्चे कसे असतात,’ असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तर, ‘अलौकिक पद्धतीने आरक्षण देणं हाच एक पर्याय आता समोर दिसतोय. सुपर न्यूमररी आरक्षण देणं आता एकमेव पर्याय. हा पर्याय राज्य सरकारने तात्काळ लागू करावा,’ असा सल्ला संभाजीराजेंनी राज्य सरकारला दिला आहे.

Source link