
मुंबई दि. १० : महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपूरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकासाच्या सक्षमीकरणावर प्रमुख्याने भर देत ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प मांडला आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सांगितले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 11 मार्च 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरील पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. तर ‘दिलखुलास’कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 12 आणि गुरूवार दि. 13 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, निवेदक संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली आहे.
समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
०००
जयश्री कोल्हे/ससं/