Home शहरे मुंबई उमेदवारांच्या दारू, चिकण आणि मटणावर मारुन ताव! निवडणूक कालावधीत तळीरामांचा सर्वत्र उसना आव !

उमेदवारांच्या दारू, चिकण आणि मटणावर मारुन ताव! निवडणूक कालावधीत तळीरामांचा सर्वत्र उसना आव !

0

बोरघर / माणगांव : ( विश्वास गायकवाड ) श्रीवर्धन व महाड विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी चुरस वाढत चालली आहे. परंतु या निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून ‘खर्चा कम और चर्चा ज्यादा हो रही है’ याकरिता तळीरामांनी एकच धंदा पत्करला आहे. दारू, मटण, चिकन याच्यावर ताव मारण्याची सुरुवात केली आहे. परमिट रुम, हॉटेल या कालावधीमध्ये ठप्प झाली आहेत. तळीराम मात्र गावागावात रात्रीच्या वेळेस पार्सल आणून ठराविक ग्रुपने बसून हैदोस घालीत आहेत, अशी चर्चा माणगांव तालुक्यात जोरदार सुरू असून बंडखोर अपक्ष उमेदवार या विधानसभा निवणुकांमध्ये आपला पराभव होणार असल्यामुळे खर्च सुद्धा कमी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेले तळीराम यांनी अपक्ष बंडखोर उमेदवारांकडे पाठ फिरवली आहे. कोणत्याही निवडणुका आली की उमेदवारांच्या जवळ असणाऱ्या तळीरामांची खायची प्यायची मजा कुछ और असते. त्यामुळे तळीराम मंडळी निवडणूक आल्या की समाधान व्यक्त करीत असतात.
या निवडणुकामंध्ये सकाळी आघाडीचा प्रचार संध्याकाळी युतीचा प्रचार असा प्रकार चालू असून या प्रचारामध्ये हेर सुद्धा पसरले असून कोण कार्यकर्ता कोणत्या उमेदवारासोबत फिरत असतो ते सुद्धा उमेदवारांना या तळीराम मंडळींकडून लगेचच समजत असते. त्यामुळे पैसे न घेणे फक्त मजा करणे हाच एकमेव धंदा तळीरामानी स्वीकारला आहे.