Home शहरे मुंबई उरण येथील ओएनजीसी प्लांटला लागलेली आग आटोक्यात, 7 जणांचा मृत्यू

उरण येथील ओएनजीसी प्लांटला लागलेली आग आटोक्यात, 7 जणांचा मृत्यू

0

नवी मुंबई :  रायगड जिल्ह्यातील उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गंभीर जखमी झालेल्या कामगारांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे वृत्त आहे.

लिक्विड गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये रात्रीपाळीचे कामगार काम करत होते. यामधील सात जणांचा मृत्यू झाला आहे तर काही कामगार यामध्ये जखमी झाले आहेत. या प्लांटमध्ये नेमके किती कामगार कामावर होते याबाबत नेमकी माहिती समोर आलेली नाही.

या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. यानंतर आजूबाजूला असलेल्या वसाहतींमधील रहिवासी सुरक्षित स्थळी धाव घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच ओएनजीसी, जेएनपीटी फायर ब्रिगेड, तसेच द्रोणागिरी, पनवेल आणि नेरुळ नेरूळ इथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या. संततधार पावसामुळे आग आटोक्यात आणण्यात अनक अडथळे येत आहेत.