उरुळीकांचनमधून दोन अट्टल गुन्हेगारांना अटक

- Advertisement -

पुणे : परवेज शेख

लोणी काळभोर – जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथून दोन अट्टल गुन्हेगारांना गावठी कट्टा व तलवारीसह सोमवारी (ता. 12) उशीरा ताब्यात घेतले आहे.

हंटर उर्फ महादेव पोपट पांगारकर (वय २४ वर्षे, रा.सहजपूर, ता.दौंड) व राहूल सुरेश भिलारे (वय २७ वर्षे रा.जावजीबुवाची वाडी, ता.दौंड) या दोघांना ताब्यात घेतले आहे. वरील दोघेही अट्टक गुन्हेगार असुन, यवत व लोणी काळभोर पोलिसात दरोडा, दरोड्याचा प्रयत्न व बेकायदा घातक शस्त्र बाळगणे असे पाच गुन्हे दाखल आहे्त. वरील दोघांच्यावर लोणी काळभोर पोलिसांनी आर्म अॅक्ट कलम ३, ४, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन, दोघांनाही अटक केली आहे.लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन हद्दीतील दत्तवाडी परीसरात दोन अट्टल गुन्हेगार मोटारसायलवरुन फिरत असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या शोध पथकातील पोलिस कर्मचारी महेश गायकवाड व निलेश कदम यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे फौजदार दिलीप जाधवर, महेश गायकवाड, निलेश कदम, विद्याधर निचित, दत्तात्रय तांबे, गुरू गायकवाड, सुभाष राऊत यांनी दत्तवाडी परीसरासह रेल्वे पुलाजवळ साफळा रचला होता. यात पल्सर मोटारसायलवरुन आलेले हंटर उर्फ महादेव पांगारकर व राहूल भिलारे हे दोन्ही गुन्हेगार अलगद अडकले. वरील दोघांना ताब्यात झडती घेतली असता, त्यांच्याकडे एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुस व एक तलावार आढळुन आली. दरम्यान वरील दोन्ही आरोपींच्यावर लोणीकाळभोर व यवत पोलीस स्टेशन येथे दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, गंभीर दुखापत, बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे एकुण ५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -