Home ताज्या बातम्या उसाच्या गुऱ्हाळयात गेला वयोवृद्ध महिलेचा हाथ पाच ही बोटांचा झाला चेंदामेंदा

उसाच्या गुऱ्हाळयात गेला वयोवृद्ध महिलेचा हाथ पाच ही बोटांचा झाला चेंदामेंदा

0

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी ) रमेश कांबळे
उसाच्या गुऱ्हाळयात गेला वयोवृद्ध महिलेचा हाथ पाच ही बोटांचा झाला चेंदामेंदा.लोणावळ्याच्या राजमाची गड पायथ्याला उसाचा रस विकत असताना महिला कामगाराचा हाथ मशीन मध्ये अडकून हाताच्या पंजाचा चेंदा मेंदा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.जखमी महिलेला कामशेत येथील बडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याने वेळीच उपचार सुरु झाले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी ६० वर्षीय महिला राजमाची गड परिसरात उसाचा रस विकते , मात्र काम करत असताना अचानक तिचा डावा हात उसाच्या यंत्रात अडकल्याने हाताच्या पंज्याला मोठी दुखापत झाली वेळीच महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु शस्त्रक्रियेसाठी पैसे नसल्याने त्यांच्यावर उपचाराचा प्रश्न निर्माण झाला होता मात्र बढे हॉस्पटिलचे डॉ. संदीप रहाणे यांनी पुढाकार घेऊन तात्काळ मोफत शस्रक्रिया करून महिलेवर उपचार केले  . सध्या महिलेची प्रकृती स्थिर  असून तिच्यावर पुढील उपचार सुरु आहे..