Home शहरे उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यात आढळलेले सर्व पॉजिटीव्ह परजिल्ह्यातलेच – जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

उस्मानाबाद जिल्ह्यात आढळलेले सर्व पॉजिटीव्ह परजिल्ह्यातलेच – जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २९ मे : उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले कोरोना पॉजिटीव्ह सर्व बासष्ट रुग्ण परजिल्ह्यातून आलेले आहेत. मुंबई, पुणे आणि सोलापूर येथून अलेल्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. या पैकी बारा जण उपचारानंतर बरे झाले आहेत. उर्वरित पन्नास रुग्णावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी एका चित्रफितीद्वारे दिली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पॉजिटीव्ह आढळलेले रुग्ण मुंबई येथून आलेले आहेत. यात लहान मुलांसह, महिला आणि वयस्क व्यक्तींचा समावेश आहे. त्यांचेवर उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात, ठिकठिकाणच्या उप जिल्हा रुग्णालयात आणि कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.  पन्नास रुग्णापैकी कांही रुग्णांना ते बरे झाल्याने लवकरच घरी पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान शासनाच्या नवीन आदेशानुसार क्वांरंटाईन केलेल्या पैकी ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे नाहीत आशाना दहा दिवसानंतर घरी पाठवायचे आहे. शेवटचे तीन दिवस मात्र त्यांचेवर विशेष लक्ष ठेवायचे आहे. असेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढुनये म्हणून शनिवारी ३० आणि रविवारी ३१ मे रोजी जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे. याचे पालन जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.