Home शहरे बीड “ऊपविभागीय पोलीस आधीकारी माजलगाव व एसटी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महीला सुरक्षा कायदे बाबत जागृती

“ऊपविभागीय पोलीस आधीकारी माजलगाव व एसटी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महीला सुरक्षा कायदे बाबत जागृती

माजलगाव: सवीस्तर वृत्त असे की महिला सुरक्षा कायदा बाबत जनजागृती व स्वच्छ बसस्थानक सुरक्षित बसस्थानक कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय पोलिस अधिकारी माजलगाव व एसटी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज माजलगाव बसस्थानक येथे आयोजन केले होते याचे उद्घाटन माजलगाव चे कर्तव्यदक्ष डी वाय एस पी श्रीकांत डिसले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.कायदे विषयक मार्गदर्शक कसबे साहेब यांनी पण मार्ग दर्शन ऊपस्थीत महीलांना केले.आगार प्रमुखांनी पण बसस्थानक स्वच्छ ठेवण्याचे व आपापली सुरक्षा कशी बाळगण्याचे सांगितले.महामंडळाचे मेन काळम पाटील यांनी पण खुप मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी शहर पोलीस स्टेशनचे सुलेमान सर पण ऊपस्थीत होते.कँमरा मन व माजलगाव प्रतीनीधी आळणे.