Home गुन्हा एकतर्फी प्रेमातून घडला प्रकार दिवाळीला आलेल्या माहेरवाशिणी चा खून

एकतर्फी प्रेमातून घडला प्रकार दिवाळीला आलेल्या माहेरवाशिणी चा खून

0

सोलापूर : जिल्हा प्रतिनिधी
एकतर्फी प्रेमप्रकरणातून माहेरी आलेल्या तरुणीचा गळा दाबून खून केल्याची घटना सोलापूर येथील दमानी नगर परिसरात घडली. प्रियांका तुकाराम गोडगे वय वर्ष 22 राहणार साकत तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
दिवाळी सणासाठी प्रियांका ही माहेरी न्यू लक्ष्मी चाळ येथे आली होती .ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियांका चौरे -गोडगे ही न्यू लक्ष्मी चाळ येथे राहत होती. त्यावेळी कॉलेजला जात असताना परिसरात राहणारा राजू श्रीकांत शंके हा तिच्या मागेमागे फिरत होता ,तिला रस्त्यामध्ये आडवून भेटण्याचा प्रयत्न करून छेडाछेडी करीत होता. याबाबत प्रियांकाने आपल्या वडिलांकडे तक्रार केल्यानंतर वडिलांनी राजू ला समज दिली होती. काही दिवसानंतर प्रियांका चा विवाह साकत येथील तुकाराम गोडगे यांच्या बरोबर झाला. परवा दिवाळी सणानिमित्त माहेरी आली होती. प्रियंका हिला श्रेया नावाची अडीच वर्षाची मुलगी आहे. श्रेयाला बरे वाटत नसल्याने तिला घेऊन दिनांक 31 रोजी सायंकाळी सहा वाजता प्रियंका दवाखान्यात गेली. दरम्यान गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास परिसरातच राहणारा श्याम निकम नावाचा इसम अडीच वर्षाच्या श्रेयाला घेऊन प्रियंकाच्या घरी आला. येऊन घरच्यांना म्हणाला की राजू शंके याने मला फोन करून यश नगर रेल्वे लाईन्स येथे बोलावून घेतले ,तेथे गेल्यानंतर प्रियंका ही चिखलात निपचित पडलेली दिसली यावेळी राजू याने श्रेया हिला माझ्या हातात देऊन तिला घरी घेऊन जा मी पोलिस स्टेशनला जातो असा निरोप दिल्याचे सांगितले. अचानक असा निरोप मिळाल्यामुळे घरातील सर्वजण घाबरले ,आणि प्रियांका ची आई आणि भाऊ हे शाम निकम सोबत प्रियंका जिथे पडली होती तिथे गेले. आणि तेथून खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रियांकाला दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी प्रियंकाला मृत घोषित केले एकतर्फी प्रेम प्रकरणातून राजू शंके याने तिचा गळा दाबून ठार मारले अशी फिर्याद प्रियंकाचे वडील गोविंद कृष्णा चौरे यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर येथे दिली आहे.


गुरुवारी रात्री आपला मित्र श्याम याला बोलावून श्रेया हीस घरी सोड असे सांगून मी पोलिस स्टेशनला जातो असे सांगितले पण तो अद्याप फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर
आहेत .दरम्यान श्याम यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या जवळचा फोनही जप्त केलेला आहे.